Headlines

NCP District President A Y Patils indication of going to Shinde group

[ad_1]

आपल्यावर प्रेम करणाऱ्या शेवटच्या कार्यकर्त्यालाही विश्वासात घेऊन येत्या चार दिवसांत योग्य तो निर्णय घेईन, असे विधान करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचे संकेतरविवारी दिले. कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार झाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी घोषणा त्यांनी मेळाव्यात केली.

हेही वाचा- बच्चू कडू आणि रवी राणांमधील वाद पेटला; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

ए. वाय. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याच्या आणि ते मुख्यमंत्री शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सोळांकूर ( ता. राधानगरी ) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील विविध गावांतील ए. वाय. समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या मेळाव्यात ते काय निर्णय घेणार याची संपूर्ण जिल्हाभर चर्चा होती. ए. वाय. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याची घोषणा केल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे.

हेही वाचा- “…त्यानंतर आज डोळ्यात पाणी आलं”; ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगनंतर राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर नाराजी

राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभर कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली. तरीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेच्या उमेदवारीची परस्परच घोषणा केल्याने दुःख झाले. आमच्या मेव्हण्या- पाहूण्यांच्या वादासमोर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनीच हात टेकल्याचे वक्तव्य केल्याने मी निराश झालो आहे,अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून ए. वाय. पाटील म्हणाले, आता योग्य निर्णय घेण्याचा आपल्यावर कार्यकर्त्यांचा दबाब आहे. त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता योग्य तो निर्णय घेईन.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *