Headlines

naxalites send threaten letter adv gunratna sadavate ssa 97

[ad_1]

एसटी कर्मचारी आंदोलनामुळे वकील गुणरत्न सदावर्ते प्रकाश झोतात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवास्थानावरील हल्ल्याप्रकरणी सुद्धा सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. त्यातच आता नक्षलवाद्यांकडून गुणरत्न सदावर्तेंना धमकीचं पत्र मिळालं आहे. त्यात मराठा आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा उल्लेख पत्रात असल्याचं सदावर्तेंनी सांगितलं आहे.

गुणरत्न सदावर्तें टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. सदावर्ते म्हणाले, “कम्युनिस्ट पक्ष भारत मुंबई विभाग यांच्याकडून नक्षली संघटनेचा संदर्भ असलेलं पत्र कार्यालयात प्राप्त झालं आहे. ‘लाल सलाम’ असं लिहलेल्या पत्रात मराठा आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षण आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनाचा उल्लेख आहे. आरएसएसबरोबर माझा संबंध असल्याचेही पत्रात म्हटलं आहे.”

हेही वाचा : “गटार दर्जाचं राजकारण”, जितेंद्र आव्हाडांवरील आरोपानंतर अंजली दमानिया संतप्त; म्हणाल्या, “विनयभंगासारखी कृती…”

“नक्षली संघटनेच्या जनता अदालतमध्ये २२ फेब्रुवारी २०२२ ला झालेल्या बैठकीत माझी हत्या करण्याचा निर्णय झाला होता,” असं खळबळजनक दावा करत सदावर्तेंनी सांगितलं, “पत्राच्या आधारे पोलीस तक्रार दिली आहे. हा विषय एटीएस आणि नक्षल सेल आणि गृहमंत्रालयाच्या संबंधित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस नक्षली संघटनांना वर तोंड काढू देणार नाही,” अशी अपेक्षा सदावर्तेंनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“नक्षलावद्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तारखांचा संदर्भ येत असून, तो थोडा संशयित आहे. कारण एप्रिल महिन्यात ‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली होती. त्यानंतर माझ्या निवासस्थानाची सुरक्षा कमी करण्यात आली, त्याच्या मागचं कारण विश्वास नांगरे पाटील सांगू शकतील. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर सुरक्षा विभागातून फोन आला होता. परंतु, नक्षली संघटनांचा प्रतिबंध करणे आवश्यक आहे,” अशी मागणीही गुणरत्न सदावर्तेंनी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *