Headlines

डेटिंगच्या चर्चांमध्ये Navya Naveli Nanda आणि सिद्धांत चतुर्वेदी स्पॉट, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…

[ad_1]

Navya Naveli Nanda With Siddhant Chaturvedi : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती की नव्या नवेली नंदा ही ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दरम्यान, त्या दोघांनी कधीच या चर्चांवर वक्तव्य केलं नाही, पण आता त्या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या दोघांना एकत्र विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी हे दोघं विमानतळावर एकत्र दिसले. ते दोघं सुट्टीचा आनंद घेऊन परत आल्याचे म्हटले आहे. त्यावेळी नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी या दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यांनी अशात ट्विनिंग केल्याचे पाहता सगळीकडे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली आहे. नव्यानं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर सिद्धांत पांढऱ्या टी-शर्टमध्ये त्याच रंगाची पॅंट आणि कॅपमध्ये दिसत आहे. हे दोघं मुंबई विमानतळावरून बाहेर पडतानाचा हा व्हिडीओ आहे. त्यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीनं शेअर केला आहे. 

नव्या आणि सिद्धांत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला “अखेर सत्य समोर आलं.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तिला त्याच्यापेक्षा चांगला मुलगा भेटला असता.” तिसरा नेटकरी म्हणाला, तिसरा नेटकरी म्हणाला, ते दोघं एकत्र खूप सुंदर दिसतात. आणखी एक नेटकरी म्हणाला, बडा हाथ मारा शेर भाई नें! दुसरा नेटकरी म्हणाला, कोणत्या गाढवासोबत फिरते नव्या. तिसरा नेटकरी म्हणाला, जर ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर तो नक्कीच खूप भाग्यवान आहे. 

हेही वाचा : महाभारत’ मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन

दरम्यान, सिद्धार्थ आणि नव्या नवेली नंदाच्या रिलेशनशिपच्या चर्चा या दिग्दर्शक करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले होते. त्यावेळी त्या दोघांनी डान्सही केला. इतकंच काय तर चित्रपट निर्माते अमृतपाल सिंग बिंद्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतही ते दिसले होते. यावेळी एका पब्लिक प्लेसमध्ये त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. सिद्धार्थला त्याच्या डेटिंगलाइफविषयी विचारता तो म्हणाला होता की, “मी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, म्हणजेच डेट करतोय या चर्चा खऱ्या आहेत, हे मी सांगू शकलो असतो तर बरं झालं असतं.”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *