Headlines

नवरात्रोत्सवात पावसाचा तडाखा ; वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू

[ad_1]

नांदेड : नवरात्रोत्सवाचा जागर शहर व जिल्हाभर सुरू असतानाच मागील तीन दिवसांपासून नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांना पावसाचा आणखी एक तडाखा बसला आहे. बुधवारी पावसासोबतच ठिकठिकाणी विजा कोसळल्यामुळे धर्माबादमध्ये एक विद्यार्थिनी मरण पावली. दुसरया एका दुर्घटनेत एक तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला.

धर्माबाद येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणारी स्वाती कामाजी आवरे (वय १५) ही विद्यार्थिनी संस्थेतून आपल्या गावी जाण्यासाठी बसस्थानकाकडे येत असताना अंगावर वीज कोसळून मरण पावली. त्याआधी नायगाव तालुक्यातील केदार वडगाव येथे एका माळरानावर प्रदीप दशरथ गायकवाड हा शेतकरी वीज पडून जखमी झाला. याच दुर्घटनेत एक गायही मृत्युमुखी पडली. नायगाव तालुक्यातील धानोरा येथे खंडोबा मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याने कळस कोसळला, पण या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

बुधवारी दुपारी नांदेड शहरात जोरदार पाऊस झाल्यानंतर सायंकाळी पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आधी जोरदार पाऊस झाला होता. तेव्हापासून हे सत्र कायम आहे. गुरुवारी वरुणराजाने दिवसभर विश्रांती घेतली होती. दुसरा अपघात वाळूज परिसरात घडला असून यामध्ये ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगला विठ्ठल शहाणे (वय ६२) या मृत महिलेचे नाव असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले. मंगला शहाणे या पहाटे वाळूज परिसरातील पंढरजवळून पायी जात असताना त्यांना एका ट्रकने उडवले. त्यांनाही घाटीमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *