Headlines

नवीन वडील मागवूया, कंटाळ आला तर 30 दिवसात…; Genelia Deshmukh च्या Trial Period चा भन्नाट ट्रेलर पाहिलात का?

[ad_1]

Genelia Deshmukh Trial Period Trailer : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. जिनिलिया ही तिच्या चित्रपट आणि खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, जिनिलिया सध्या चर्चेत असण्याचं कारण हा तिचा आगामी चित्रपट ‘ट्रायल पीरियड’. ‘ट्रायल पीरियड’ हा एका अपारंपरिक कुटुंबाच्या एकत्र येण्याची एक सुंदर पटकथा आहे.

जिनिलिया या चित्रपटात एका अविवाहित आईच्या भूमिकेत दिसणार आहे. जिनिलियाचा जिज्ञासू मुलगा 30 दिवसांच्या प्रोबेशन कालावधीसाठी एक नवीन वडील आणुया असं सांगतो. त्यातही जर आवडले नाही तर त्यांना रीटर्न करू असं त्याचं मत असतं. आई आणि मुलाला काय हवे आहे याच्या अगदी विरुद्ध असलेल्या उज्जैनमधील एका शिस्तप्रिय व्यक्तीला जिनिलिया तिच्या मुलाच्या वडिलांच्या रुपात घेऊन येते. त्यानंतर त्यांची एक मजेशीर गोष्ट पहायला मिळते. जिनिलियाचा आगामी चित्रपट ‘ट्रायल पीरियड’ हा ज्योती देशपांडे निर्मित, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, हेमंत भंडारी, अमित रविंदरनाथ शर्मा आणि आलिया सेन निर्मित, क्रोम पिक्चर्स प्रोडक्शन आहे. 

चित्रपटाविशयी बोलताना जिनिलिया म्हणाली, “मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे मी चित्रपटाची निवड त्याच्या गुणवत्तेवर करते. जेव्हा मला दिग्दर्शकांकडून ऑफर मिळाली तेव्हा ही पटकथा ही आई आणि बाबा बद्दल होती. कथेच्या या टप्प्यावर, एक स्त्री वेगवेगळ्या नात्यांमधून जात आहे. ही पटकथा एका अविवाहित आईबद्दल आहे जिला तिचे खरे प्रेम सापडते. मी त्याचा एक भाग होण्यासाठी खरोखरच उत्साहित आहे. आता फक्त मी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. हा एक असा चित्रपट आहे जो पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होतील. ट्रायल पीरियड टीमने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या कामाची प्रेक्षकांकडून नक्कीच प्रशंसा होईल.

हेही वाचा : “काही तासचं उरले आहेत…”, Video पोस्ट करत असं का म्हणाले Sourav Ganguly?

मानव कौल म्हणाला, “मला अप्रतिम कलाकार आणि अप्रतिम टीमसोबत काम करण्याचा आनंद मिळाला आहे. आपल्या सर्वांसाठी चित्रपटात एक वेगळी भूमिका असते आणि त्यातून आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो.त्यातच एक दिग्दर्शक म्हणून अलिया सेनच्या क्षमतांचे सौंदर्य दडले आहे. जेव्हा मी चित्रपट पूर्ण केला, तेव्हा माझ्या आईने मला खरोखर हृदयस्पर्शी पत्र लिहिले. मला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.”

ट्रायल पीरियड हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळं जग दाखवेल. ज्यात विनोद, रोमांस, नाटक आणि इमोश्नल अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. हा चित्रपट 21 जुलै 2022 रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जिनिलिया व्यतिरिक्त मानव कौल, शक्ती कपूर, शीबा चड्डा, गजराज राव आणि झिदान ब्राझ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *