Headlines

लव्ह स्टोरी की मर्डर मिस्ट्री? ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाबद्दल 25 वर्षांनी उलघडलं रहस्य; पाहा Video

[ad_1]

Kuch Kuch Hota Hai: जग कितीही पुढं जाऊद्या वो… 90 च्या दशकातील सिनेमांचा नादच खुळा…! बॉलिवूडचे सोनेरी दिवस म्हणून आजही ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमांकडे पाहिलं जातं. चहाच्या टपरीवर असो वा गाण्यांच्या भेंड्यात.. 90 च्या दशकातील सिनेमांची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. त्यातील कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) हा सिनेमा आजही सर्वजण आतुरतेने पाहत असतात. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. अशातच आता हा सिनेमा नेमका लव्ह स्टोरी आहे की मर्डर मिस्ट्री? असा सवाल आता विचारला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान शेअर होत असल्याचं दिसतंय. सिनेमा प्रेमी आणि इंस्टाग्राम इन्फ्लूसर करण मिरचंदानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये मिरचंदानी यांनी हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा मर्डर मिस्ट्री असल्याचे वर्णन केले आहे. त्यावरून आता सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. ‘कुछ कुछ होता है’ हा माझा आवडता मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे, असं करण मिरचंदानी म्हणतात. त्यावेळी सिनेमा कशाप्रकारे मर्डर मिस्ट्री ठरू शकतो, याचं विश्लेषण केलंय.

सिनेमात एक मुलगी आहे जिला तिच्या आईने लिहिलेली 8 पत्रं तिला मिळतात, जिचा मृत्यू अत्यंत गूढपणे होतो. त्याचं कारण सिनेमात सांगण्यात आलं नाही. हे विचित्र नाही का? आता आई आपल्या मुलीला हे का लिहील? असा सवाल मिरचंदानी विचारतात. राहुल गरिब असतो तर टीना श्रीमंत. टीनाच्या मृत्यूनंतर राहुल आणि अंजलीला लग्न करायचं असतं, मात्र, अडचण असते ती लहान मुलीची. काही वर्षांनी टीना गूढपणे गायब झाली. मुलगी अचानक दुसऱ्या आईच्या दिशेने प्रयत्न करु लागते. तिला तिची नवी आई खूप आवडू लागते, हे विचित्र नाही का?

पाहा व्हिडिओ 

खुनाचे हे एकमेव रहस्य आहे ज्यात मारेकरी पकडले जात नाहीत, असा काल्पनिक सिनेमा मिरचंदानी यांनी तयार केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत कौतूक केलंय. तर अनेकांनी टीका देखील केलीये. 16 ऑक्टोबर 1998 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपट आजही अनेकांच्या मनात घर करून बसला आहे.

आणखी वाचा – खरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर फराह खान हिने ‘कुछ कुछ होता है’ सिनेमा संबंधीत एक मोठं सत्य उघड केलं आहे. कुछ कुछ होता हैमधील साजन जी घर आए गाण्यासाठी रित्झीने प्रचंड मदत केली होती. सलमानच्या डुप्लिकेटच्या मदतीने संपूर्ण गाणं शूट केलं आणि ते गाणं प्रचंड हीट झालं, असंही फराह खान म्हणाली होती.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *