Headlines

Nashik-Malegaon former corporator meet Shiv Sena chief Uddhav Thackeray

[ad_1]

नाशिक आणि मालेगावच्या नगरसेवकांनी मातोश्री निवास्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. नाशिक मालेगावच्या आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर नाशिकमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर या प्रभागातील माजी नगरसेवकांनी ठाकरेंची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. “कितीही आमदार, खासदार फुटू देत, आम्ही उद्धव ठाकरें सोबतच असणार”, असा विश्वास माजी नगरसेवक राजाराम जाधव यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- ठाणे : “राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर ‘त्यांचा’ दौरा निघाला असता का?”

नगरसेवकांचे एकनिष्ठतेबाबत शपथपत्र

यावेळी या नगरसेवकांकडून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याबाबतचे शपथपत्रही भरुन घेण्यात आलं. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर आणि आगामी पक्षाच्या भूमिकेबाबतही चर्चा करण्यात आली. बंडखोरीनंतर नाशिक-मालेगावसोबत नांदगावत पुन्हा शिवसेनेची सत्ता आणण्याबाबत उद्धव ठाकरेंनी या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. आगामी निवडणुकीत पक्षाची रणनितीबाबतही बैठकीत चर्चा झाली.

हेही वाचा- “तुमची बेसूर पिपाणी बंद करा,” संजय राऊतांवर भाजपाची बोचरी टीका

८ ऑगस्टला निवडणूक आयोगात सुनावणी
शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेना पक्षावरुन सुरु असलेला वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. येत्या ८ ऑगस्टाला आयोगात याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे ८ ऑगस्टपर्यंत बहुमताबाबत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा निर्देश आयोगाने दोन्ही गटांना दिला आहे. तसेच शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणाबाबतही त्याच दिवशी फैसला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची याबाबतच लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *