Headlines

नसीरुद्दीन शाह यांच्यावर मित्रानेच केला होता चाकू हल्ला, पहिल्यांदाच सांगितला ‘तो’ प्रसंग

[ad_1]

Naseeruddin Shah Was stabbed by his actor friend : बॉलिवूड दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपटातील अभिनय हा प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडून गेला आहे. चित्रपटादरम्यान, सतत आपण एखाद्या व्यक्तीसोबत पूर्ण वेळ राहतो. त्यात आपली त्यांच्याशी चांगली मैत्री होते. तसेच त्यांचे अनेक मित्र देखील झाले. पण तुम्हाला माहितीये का नसीरुद्दीन यांना एका मित्रानेच त्यांच्यावर चाकूनं वार केला होता. तर त्यावेळी एका अभिनेत्यानं त्यांना वाचवलं होतं. याविषयी त्यांनी त्याचं पुस्तक ‘अँड देन वन डे’ मध्ये सांगितलं आहे. 

1977 मध्ये आलेल्या ‘भूमिका’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक दिवस नसीरुद्दीन हे ओम पुरी यांच्यासोबत जेवायला गेले होते. तेवढ्यात त्यांचा मित्र जसपाल तिथे आला. नसीरुद्दीन आणि जसपाल यांचं नातं तणावपूर्ण होतं. ‘आम्ही एकमेकांकडे दुर्लक्ष केले पण, पण त्याची नजर माझ्यावर खिळली, तो माझ्या मागे असलेल्या दुसर्‍या टेबलावर बसायला गेला, असं मला वाटलं. पण थोड्या वेळानं माझ्या पाठीवर एक लहान तीक्ष्ण वस्तूनं वार केल्याचं मला जाणवलं. मी तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मी हालचाल करण्याआधीच ओम ओरडला आणि त्यानं त्याला पकडलं. त्याच्याजवळ असलेल्या चाकूवरून रक्ताचे थेंब खाली पडत होते. त्यानं पुन्हा एकदा वार करण्याचा प्रयत्न केला, पण ओम आणि इतर दोघांनी त्याला नियंत्रित केलं’, असं त्यांनी सांगितलं.

नसीरुद्दीन यांनी पुढे लिहिलं, ‘जसपालला किचनमध्ये नेण्यात आलं आहे, असं ओमने मला सांगितलं. तो मला डॉक्टरांकडे घेऊन जात होता पण रेस्टॉरंटच्या कर्मचार्‍यांनी पोलीस येईपर्यंत आम्हाला जाऊ देणार नसल्याचं म्हटलं. जेव्हा रुग्णवाहिका आली, तेव्हा ओमने परवानगीशिवाय आत चढण्याची चूक केली. त्यानं बॉस-मॅनला चिडवले आणि पोलिसांना माझ्याशी नीट वागण्यास सांगितले. त्याला उतरण्यास सांगण्यात आलं पण तो उतरला नाही. आम्ही रुग्णवाहिकेत होतो आणि आम्ही कुठे जातोय याबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे ते आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ नयेत, यासाठी मी प्रार्थना करत होतो.’

हेही वाचा : ‘मला वाटलं माझं करिअर संपलं…’, अमिताभ सेटवर असताना घडलेल्या ‘त्या’ नकोश्या प्रकाराची अभिनेत्यानं घेतलेली धास्ती

नसीरुद्दीन यांनी आणखी पुढे सांगितले की ‘रक्तस्त्राव थांबत नव्हता, तीव्र वेदना होत होत्या आणि पोलिसांना नेमकं काय घडलंय ते कळत नव्हतं. पोलिसांनी आम्हांला काही प्रश्न विचारले आणि नंतर आम्ही जुहू येथील कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हे सगळं झाल्यानंतर मी घरी एकटा असताना जसपाल भेटायला आला होता. पण माफी मागण्याऐवजी त्याने जे काही घडले त्यात पर्सनल काहीच नव्हतं, असं म्हटलं होतं.’ यामुळे नक्की हे प्रकरण कशामुळे झालं का झालं असा प्रश्न उपस्थित झाला. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *