Headlines

nana patole criticize Central Government Ujjwala Gas Scheme subsidy scheme

[ad_1]

मोदी सरकारने वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा केली होती. यावर्षी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या करोडो लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना १२ एलपीजी गॅस सिलिंडरसाठी याचा लाभ मिळणार आहे. या योजनेवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाना पटोले यांनी केंद्रावर टीका केली आहे. मोदी सरकारने सबसिडीच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी ही सबसिडी जाहीर केल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे. याबाबत ट्वीट करत पटोलेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- “शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव” पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

‘मोदी सरकारने सबसिडीच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी देशात एकूण ३० कोटी एलपीजी धारक असताना केवळ ९ कोटी उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना सबसिडी देण्याचा फतवा जारी केला’ असं ट्वीट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

या योजनेचा लाभ केवळ महिलांनाच होणार आहे. तसेच १८ वर्ष पूर्ण असलेल्या महिलांनाच याचा फायदा होऊ शकतो. या महिलांच्या घरात कोणत्याही तेल कंपन्यांचे एलपीजी कनेक्शन नसावे. तसेच केवळ SC, ST, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), अतिमागास वर्ग, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, बेट रहिवासी, गरीब कुटुंबे इत्यादींनाच याचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पालापाचोळा, पानगळ…”

याबाबत माहिती देताना तेल सचिव पंकज जैन यांनी स्पष्ट केले आहे की, सरकार जून २०२० पासून एलपीजी गॅस सिलिंडरवर कोणतीही सबसिडी देत ​​नाही. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून सरकार जनतेला गॅस सिलिंडरवर कोणतेही अनुदान देण्यात येत नाही. सध्या सरकार एलपीजी गॅस सिलिंडरवर एकच सबसिडी देत ​​आहे. जे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *