Headlines

Gadar 2 मध्ये नाना पाटेकर यांची एन्ट्री! 22 वर्षांपूर्वीच हा चित्रपट ‘ब्लॉकबस्टर’

[ad_1]

Gadar 2 Nana Patekar : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तारा सिंगच्या लूकमध्ये सनी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. तर अमीषाला सकीनाच्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. दरम्यान, आता माहिती समोर आली आहे की अभिनेता नाना पाटेकर या चित्रपटात महत्त्वाचं काम करतान दिसणार आहे. पण यावेळी नाना पाटेकर हे अभिनय करताना आपल्याला दिसणार नाही तर एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटासाठी नाना पाटकेर यांनी त्यांचा आवाज दिला आहे.  

‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी ओम पुरी यांनी त्यांचा आवाज दिला होता तर त्याच्या दुसऱ्या भागासाठी नाना पाटेकर आवाज देणार आहेत.  ‘गदर 2’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा आणि सनी देओल हे 2001 नंतर आता पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत.  ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाना पाटेकर हे चित्रपटाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना त्यांच्या आवाजात सगळ्यांना चित्रपटाची ओळख करून देणार आहेत. याविषयी चित्रपट समिक्षक आणि ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली. त्यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की ‘गदर: एक प्रेम कथा’ साठी ओम पुरी यांनी व्हॉइस ओव्हर दिला होता.

दरम्यान, अनिल शर्मा यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये “काही क्षण हे खूप किंमती असतात. असाच काहीसा हा क्षण आहे. नाना पाटेकर जी तुमचे आभार. तुमच्या सारख्या दिग्गजासोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. ‘गदर 2’ साठी तुमचं प्रेम आणि तुमचं व्हॉइस ओव्हरशी कसली तुलणा होऊ शकत नाही. आभार आणि मला आठवण आहे की तुम्ही मला गदर एकच्या प्रदर्शनापूर्वी सांगितले होते की ब्लॉकबस्टर होईल. यावेळी देखील तुम्ही तुमचं प्रेम आम्हाला दाखवलं. ओपनिंद पाहिली. झूम झूम आणि मैं निकला गड्डी लेके गाणं पाहिलं. उत्कर्ष शर्माला मिठी मारली. सनी देओलची खूप स्तुती केली, म्हणाले की देवाच्या इच्छेनं ही कहानी परत पाहायला मिळेल. यावेळी देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळेल.” 

चित्रपटात नाना पाटेकर यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर आहेत. प्रेक्षक आतापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटातील उड जा काले कावा हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. प्रेक्षकांना आता प्रतिक्षा आली आहे ती  मैं निकला गड्डी लेके आणि आणखी काही गाणी येतील याची. 

हेही वाचा : “हिंदू धर्माविरोधात काही उलट सुलट दाखवलं तर…”, महादेवाच्या लूकमध्ये Akshay Kumar ला पाहताच नेटकऱ्यांचा इशारा

झी स्टुडियोजनं ‘गदर 2’ चे प्रोडक्शन केलं आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2)  या चित्रपटासोबत ‘गदर 2’ चं क्लॅश होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *