Headlines

‘नेमकी पप्पी कोणाची घ्यायची…’ शशांक केतकरनं शेअर केला प्रेमी युगुलांचा ‘तो’ व्हिडीओ; चर्चेला उधाण

[ad_1]

Shashak Ketkar Marine Drive Video: अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. यावर्षी प्रदर्शित झालेली त्याची ‘स्कॅम 2003’ ही वेबसिरिज प्रचंड गाजली. आपल्या चाहत्यांनाही तो कायमच अपडेट ठेवतो. नुकताच त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मरीन ड्राईव्हवर सकाळी मॉर्निंग वॉकला अनेक फीटनेस फ्रीक मंडळी जातात. सोबतच कुटुंबिय, मित्रांचा ग्रुप हा येथे फिरायलाही येतो.

परंतु त्याहून येथे लव्ह स्पॉट म्हणूनही प्रेमी युगुलं अनेक तास बसलेली असतात. भरपूर वेळेला प्रेयसी-प्रियकर एकमेकांचे चुंबन घेतानाचे दृश्यंही अनेकांच्या नजरेस पडते. एकमेकांना मिठीत घेत तासन्तास आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी हे कपल्स मरीन लाईन्स येथे येतात. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. 

सध्या असाच एक व्हिडीओ हा शशांक केतकरनंही शेअर केला असून त्यानं एक विनोदी कॅप्शनही दिलं आहे. यावेळी त्यानं लिहिलंय की, ”नेमकी पप्पी कोणाची घ्यायची हा गोंधळ होत नसेल का यांचा??”. सध्या त्यानं शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. त्यामुळे त्याची चर्चा रंगलेली आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीही नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहे. अनेकदा असे प्रेमी युगुल हे सोशल मीडियावर ट्रोलही होताना दिसतात. काही जणं तर त्यांची फार खिल्लीही उडवताना दिसतात. असे व्हिडीओही सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची काहीच खात्री नाही. त्यातून हल्ली चित्र-विचित्र व्हिडीओही सतत ट्रेण्डिंगमध्ये असतात. 

हेही वाचा : ‘…नाहीतर ‘मुळशी पॅटर्न’ 100 कोटी कमावू शकला असता’; प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली होती खंत

‘होणार सुन मी ह्या घरची’, ‘कालाय तस्मै नम:’, ‘हे मनं बावरे’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांतून शशांक केतकर आपल्या भेटीला आला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. ‘कुसुम मनोहर लेले’, ‘गोष्ट तशी गमतीची’ अशा नाटकांमधूनही त्यानं अभिनय केला आहे. सोबत त्याचे अनेक मराठी चित्रपटही गाजले आहेत. सध्या तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या ही मालिका प्रचंड गाजते आहे. 

शशांक केतकरनं इन्टाग्राम स्टोरीतून हा व्हिडीओ शेअर करत गमतीशीर कॅप्शन दिलं आहे. 

शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांचा 2015 साली घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. त्यांची जोडी ही प्रचंड गाजली होती. सोबतच श्री आणि जान्हवी म्हणून आजही मराठी प्रेक्षक त्यांना ओळखतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *