Headlines

नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात; इन्स्टा पोस्ट शेअर, आकाश ठोसरच्या कमेंटनं वेधलं लक्ष

[ad_1]

Nagraj Manjule Khashaba Movie Shooting Begins: लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘खाशाबा’ चित्रपटाची चर्चा आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांनी या आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. सुप्रसिद्ध कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातून मुख्य भुमिका कोण साकारणार याबद्दल सध्या कुठलाच खुलासा झालेला नाही. परंतु सर्वत्र ही भुमिका अभिनेता आकाश ठोसर करणार असल्याची बरीच चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. आकाश ठोसर रवी जाधव यांच्या ‘बाल शिवाजी’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या भुमिकेतून दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही जाहीर करण्यात आले आहे. 

सध्या नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून त्यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होते आहे ही आनदांची बातमी शेअर केली आहे. ‘चांगभलं’ असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. नागराज मंजुळे यांचा ‘नाळ 2’ हा चित्रपट मागच्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचाही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली होती. 2018 साली ‘नाळ’ चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं तूफान कमाई केली होती.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ बॉलिवूड आणि खुद्द मराठी चित्रपटांशीही स्पर्धा असताना या चित्रपटानं घसघशीत गल्ला भरला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. लहानग्या चैत्याचे भावविश्व या चित्रपटातून आपल्या भेटीला आले होते. श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदार, नागराज मंजुळे, दिप्ती श्रीकांत, जितेंद्र जोशी यांचा बहारदार अभिनय या चित्रपटातून पाहायला मिळाला होता. 

हेही वाचा : धडपडली, लागलं तरीही… डेब्यू चित्रपटासाठी पाहा किती मेहनत घेतलंय सुहाना; VIDEO VIRAL

यावर्षी त्यांना ‘घर बंदूक बिर्यानी’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांची आगळीवेगळी भुमिका होती. हा चित्रपटही बराच गाजला होता. त्यामुळे त्याची बरीच चर्चा ही रंगलेली होती. सध्या या पोस्टखाली सर्वांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी नागराज यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

खाशाबा जाधव हे सुप्रसिद्ध कुस्तीपटू होते. त्यांची आजही तितकीच चर्चा आहे. 1952 साली झालेल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. हे पदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील ते पहिले खेळाडू होते. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी गुगल डुडलनंही त्यांना मानवंदना दिली होती. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *