Headlines

नागपूर : ‘शादी डॉट कॉम’वर ओळख, लग्नाचे आमिष, शेवटी बलात्कार | Nagpur Sexual abuse of a young woman by a Soldier whos working in Sikkim msr 87

[ad_1]

‘शादी डॉट कॉम’वर ओळख झाल्यानंतर अभियंता असलेल्या तरुणीवर सिक्कीममध्ये कार्यरत असलेल्या जवानाने बलात्कार केला. लग्नाची गळ घातली असता त्याने नकार दिला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका जवानावर गुन्हा दाखल केला आहे. अमोल एकनाथ दुकळे (३०) रा. पालखेड हनुमान गल्ली, नाशिक असे आरोपीचे नाव आहे.

२३ ऑक्टोबर २०२१ ते १ जून २०२२ दरम्यान ही घटना घडली. तरुणीचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून ती खासगी नोकरी करते. तिने ‘शादी डॉट कॉम’वर आपली प्रोफाईल अपलोड केली होती. ही प्रोफाईल पाहून अमोलने तिला फोन केला. ‘मी तुमची प्रोफाईल पाहिली आहे. ती प्रोफाईल मला आवडली आहे. मी ‘आर्मी’मध्ये नायक सुभेदार आहे’ असे सांगितले. त्यानंतर ते मोबाईलवर चॅटिंग करू लागले. तरुणीने ही माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती.

घटनेदरम्यान एकदा अमोल नागपूरला आला. त्याने तरुणीला फोन करून सोनेगाव हद्दीत बोलावले. रिझर्व्ह बँक कॉलनी, सोमलवाडा येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिचे अनेकदा हॉटेल आणि लॉजवर नेऊन लैंगिक शोषण केले. त्यानंतर मुलीने त्याला लग्नाबद्दल विचारणा केली असता अमोलने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. ती त्याच्या घरी गेली असता तो आर्मीच्या कँपमध्ये तैनात असल्याचे समजले. तरुणीने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधून लग्नाबद्दल विचारणा केली असता त्याने तिला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *