Headlines

mumbai pune nashik nagpur konkan live news updates maharashtra weather report today shinde vs thackeray political crisis breaking news

[ad_1]

Maharashtra Political Crisis Live News, 07 October 2022 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर धनुष्यबाण निशाणी नेमकी कोणीची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या वादाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. त्यातच शिंदे गटाने अर्ज करुन उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे पाठबळ नसताना त्यांच्याकडून धनुष्यबाण या चिन्हाचा अंधेरी पोटनिवडणुकीत चुकीच्या पद्धतीने वापर केला जाईल असा दावा केला आहे. याच कारणामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

याशिवाय नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर – शिर्डी या पहिल्या टप्प्याचे दिवाळीपूर्वी उद्घाटन करण्याचे नियोजन राज्य सरकारने केल्याची माहिती समोर आली आहे. तर, भाजपा नेते राम कदम यांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाला विरोध दर्शवलेला असताना, आता मनसेने या सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे.

यासह राज्यभरातील विविध घडामोडींचा सविस्तर आढावा वाचा फक्त एकाच क्लिकवर

Live Updates

Maharashtra Breaking News Updates : यासह राज्यभरातील विविध घडामोडींचा सविस्तर आढावा वाचा फक्त एकाच क्लिकवर

MNS Supports Adipurush

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *