Headlines

मुंबई-गोवा महामार्गावर नदीपात्रात सापडलेल्या स्फोटकांबद्दल मोठा खुलासा | Explosives found on Mumbai Goa Highway are duplicate sgy 87

[ad_1]

मुंबई-गोवा महामार्गावर नदीपात्रात सापडलेली स्फोटके खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे पेणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गुरुवारी सांयकाळी पेण पोलिसांना मुंबई- गोवा महामार्गावर भोगावती पुलाखाली बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा फोन आला होता. या घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी बॉम्बशोधक पथकांना पाचारण केलं होतं. अलिबाग आणि नवी मुंबईची बिडीडीएस पथके घटनास्थळी दाखल झाली होती. नवी मुंबईचे दहशतवाद विरोधी पथकही रात्री उशीरा दाखल झालं होतं.

या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्ह्यातील सर्व प्रमुख पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आसपासचा परिसर खबरदारी म्हणून रिकामा करण्यात आला होता. महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही काळ रोखून धरली होती. यानंतर मध्यरात्री उशिरा नदीपात्रातून ही बॉम्बसदृश्य वस्तु बाहेर काढण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केल्यानंतर हा एक बनावट बॉम्ब असल्याचं निष्पन्न झालं. बॉम्बसाठी वापरण्यात आलेल्या जिलेटीनच्या कांड्याही खोट्या असून त्यात कुठलेही स्फोटक नसल्याचं समोर आलं. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

कोणीतरी खोडसाळपणा म्हणून हा खोटा बॉम्ब नदीपात्रात पुलाखाली टाकला असल्याचं समोर आलं आहे. हा खोडसाळपणा करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

“पुलाखाली नदीपात्रात सापडलेल्या बॉम्बसदृश्य वस्तूत कुठलीही स्फोटके आढळून आलेली नाहीत. सर्व खबदारी घेऊन आम्ही या बॉम्बसदृश्य वस्तूची विल्हेवाट लावली आहे. कोणीतरी खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केला आहे,” अशी माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *