Headlines

ठाणे येथील घटनेचे बार्शीत पडसाद , नगर पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

बार्शी/ प्रतिनिधी – 30 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला . या हल्ल्यामध्ये त्यांची हाताची तीन बोटे कापली गेली आहेत . डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. सदर कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच खचतो. तसेच संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होते . त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा बार्शी नगर पालिका कर्मचारी संघाच्या वतीने बार्शी नगर पालिके समोर अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित येऊन तीव्र निषेध नोंदवीत आणि हल्लेखोरांवर लवकरात लवकर अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

ठाणे येथे महिला अधिकाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्लाचा जाहीर निषेध व्यक्त करते हा झालेला हल्ला म्हणजे प्रशासनाचे हात कलम केल्यासारखा घडलेला प्रकार आहे आरोपींना तात्काळ अटक करुन आरोपींना कडक शिक्षा व्हावी.- मा. अमिता दगडे – पाटील ,मुख्याधिकारी बार्शी नगर परिषद


तसेच या घटनेचा निषेध म्हणून आज रोजी बार्शी नगरपरिषदेच्या संपूर्ण विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. यावेळी नगर पालिका कर्मचारी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील,बांधकाम विभागाचे भारत विधाते,शिवाजी नाईकनवरे, लेखा विभाग प्रमुख मिनाक्षी वाकडे,स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद,नितीन शेंडगे ,हर्षल पवार, विद्युतविभागाचे अविनाश शिंदे, मनोज खरात, तुषार खडके,भांडार विभागाचे भगवान बोकेफोडे,दत्तात्रय कुलकर्णी ,मिळकत व्यवस्थापक महादेव बोकेफोडे, लिपीक विनोद जगताप, आप्पासाहेब राऊत, अशोक चिपडे ,पाणी पुरवठा विभागाचे मनोज खरात,योगेश कारंजकर,सागर नान्नजकर, स्वच्छता सुपरवायजर डॉ. प्रकाश लंकेश्वर,जयपाल वाघमारे,आनंद कांबळे, मुकुंद पवार, अजित कांबळे, आबासाहेब आगलावे, योगेश घंटे संतोष कांबळे,निवृत्ती क्षिरसागर, अभिजित ढोले ,जयश्री हिरेमठ, ज्योती कदम सुनिता बुगडे,सारिका कुदळे,मनिषा हराळे, कुसुम ठोकळ, सचिन पवार,मारुती पवार,संभाजी कदम आदींसह अधिकारी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *