Headlines

मोठी बातमी! गायक अरिजीत सिंग जखमी, लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडली धक्कादायक घटना

[ad_1]

Arijit Singh Video : आपल्या गाण्यांमुळे अरिजित सिंग कायमच चर्चेत असतो. पण औरंगाबादमध्ये (aurangabad) झालेल्या एका कॉन्सर्टमुळे अरिजीत सिंह (Arijit Singh) पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायक अरिजित सिंहसोबत धक्कादायक प्रसंग घडला आहे. एका चाहत्यामुळे अरिजित सिंह लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (arijit singh live concert) जखमी झाला आहे. औरंगाबादमधल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायक अरिजित सिंग जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अरिजीत सिंग दिल्ली, चेन्नई, कोलकाता यासह भारतातील अनेक शहरांमध्ये कार्यक्रम करत आहेत. रविवारी रात्री त्याचा औरंगाबादमध्ये कार्यक्रम होता. कॉन्सर्टदरम्यान त्याच्या एका चाहत्याने त्याचा हात ओढल्याने अरिजित सिंग जखमी झाला आहे.

उत्साही चाहत्याच्या कृतीमुळे अरिजित सिंह चांगलाच जखमी झाला आहे. दुखापत झाल्यामुळे त्याला कॉन्सर्ट थांबवावा लागला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अरिजित सिंग या घटनेनंतर त्याच्या चाहत्याशी बोलताना दिसत आहे. परफॉर्मन्सदरम्यान अरिजित त्याच्या चाहत्यांशी बोलत होता. तेव्हा एका व्यक्तीने त्याच्याशी हात मिळवण्याच्या  प्रयत्नात त्याचा उजवा हात जोरात ओढला. यामुळे अरिजितचा तोल गेला आणि तो जखमी झाला. मात्र यानंतरही त्याने संयम सोडला नाही.

“तू मला ओढण्याचा प्रयत्न करत होता. प्लीज स्टेजवर ये. ऐक, माझा हात दुखत आहे, ठीक आहे? तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल,” असे अरिजितने सांगितले. यावर जेव्हा चाहत्याने प्रतिक्रिया दिली तेव्हा अरिजित म्हणाला की, “तू मला खेचत होतास. माझे ऐक, विनाकारण कुणाला दोष देण्याचा प्रकार मी नाही करत. खरंच माझा हात दुखत आहे.”

“तुम्ही इथे मजा करायला आला आहात. काही हरकत नाही. पण, जर मी पण परफॉर्म करू शकलो नाही तर तुम्हाला मजा कशी येईल. हे तितकंच सोपं आहे. तू मला असं खेचलसं आता माझा हात थरथरत आहेत. मी जातो, असे अरिजितने म्हटलं. त्यावर चाहत्यांनी त्याला न जाण्याची विनंती केली. यानंतर अरिजित सिंह म्हणाला, तू मला असे का ओढले? माझा हात सध्या थरथरत आहेत. मी माझा हात हलवू शकत नाही.”

दुसरीकडे अरिजितचा हा व्हिडीओ समोर येताच जोरदार व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर लोक अरिजित सिंगचे कौतुक करत आहेत. चाहत्याने जोरात हात खेचल्यानंतरही अरिजितने त्याला आरामात समजवल्याचे पाहून चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. अरिजित सिंगची ही वृत्ती लोकांना खूप आवडली आहे. तर काही युजर्सनी त्या चाहत्यावर टीका केली आहे. तुझ्यामुळे अरिजित सिंग जखमी झाला आहे. कालची घटना अतिशय लज्जास्पद होती, अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *