Headlines

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला….”| mns chief raj thackeray appeals devendra fadnavis not to contest andheri east by election help to win rutuja latke

[ad_1]

अंधेरी पूर्व विधानसभा निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. या निवणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. असे असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपाला आवाहन केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे तुमचीही…” म्हणत आदित्य ठाकरेंनी घेतला वक्तव्याचा समाचार

राज ठाकरे यांच्या पत्रात नेमके काय आहे?

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.”दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल,” असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “दगडफेक व्हायची, डोकी फुटायची” शिवसेनेतील बंडखोरीनंतर काय घडलं? छगन भुजबळ यांनी सांगितली आठवण

“माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,” अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

हेही वाचा >> अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे गंभीर आरोप

मांडली पक्षाची भूमिका

“मी माझ्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात, तेव्हा शक्यतो निडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे, असे मला माझे मन सांगते. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *