Headlines

मोठी बातमी! पंतप्रधान करणार ‘ही’ मोठी घोषणा, होणार यामध्ये मोठी वाढ

[ad_1]

PM Narendra Modi: पुढच्या आठवडयात रक्षाबंधनाचा सोहळा आहे. या सणासाठी संपुर्ण देशात आनंदाचे वातावरण असणार आहे. तेव्हा या आनंदात आता अजून एका आनंदाची भर पडणार आहे. खुद्द पंतप्रधानांनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर मिळणार आहे. सरकारकडून सातव्या वेतन आयोगात (7th Pay Commission) महागाई भत्ता (dearness allownace) मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

नुकत्याच आलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आहे. सध्या महागाई भत्ता हा 34 टक्के आहे. जर सरकारने यात किमान वाढ म्हणजे 4 टक्के वाढ केली तर महागाई भत्ता (dearness allownace) किमान 38% ने वाढण्याची शक्यता आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. 

काय होणार मंत्रिमंडळाच्या चर्चेत?
PM Narenda Modi यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात होणार आहे. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (dearness allownace) वर चर्चा होऊन त्यावरील वाढीला सरकारची मंजूरी मिळू शकते. सरकारकडून या भत्त्यात 4 ते 5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. 

1 जुलैपासून लागू होणार महागाई भत्ता (dearness allownace) मधील वाढ…
सरकारने महागाई भत्ता (dearness allownace) वाढवण्याचा निर्णय घेतल्यास तो 1 जुलै 2022 पासून लागू होईल. लवकरच वाढीव पगार आणि थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येण्याची अपेक्षा आहे. महागाई भत्त्यात (dearness allownace)  4 टक्के वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचेल. जुलै महिन्यापासून तुमचा पगार खालीप्रमाणे होईल.

कमाल मूळ पगाराची गणना
1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900
2. नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.19,346/महिना
4. महागाई भत्त्यात 21,622-19,346 ने किती वाढ झाली = रु 2260/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2260 X12 = रु. 27,120

किमान मूळ पगाराची गणना
1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000
2. नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.1080/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720 X12 = रु 8640



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *