Headlines

भाजपाने माघार घेतल्यानंतर राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र | MNS Raj Thackeary Letter to BJP Devendra Fadnavis after withdrawing Muraji Patel nomination from Andheri By Poll Rutuja Latke sgy 87

[ad_1]

भाजपाने आपल्या पत्राची दखल घेत अंधेरी पूर्व् विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरेंनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय परंपरेचं पालन करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर भाजपामध्ये वेगवान घडामोडी घडल्या आणि अखेर ऋतुजा लटकेंविरोधातील मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्यात आली.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं आहे?

“काल केलेल्या विनंतीली मान देऊन आपण अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार. चांगली, सकारात्मक संस्कृती सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न मनसे म्हणून आम्ही कायमच करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार,” असं राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे.

भाजपाची माघार

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले “५१ टक्के आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. आम्ही रणांगणात असून, वॉर्डात जुळवाजुळव झाली होती. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आम्ही १०० टक्के निवडणूक जिंकणार होतो. पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे हा विचारही करण्यात आली. यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतलाआहे. ही संस्कृती आजची नसून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून अनेक उदाहरणं आहेत”.

मुरजी पटेल अपक्ष लढतील का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. एकदा भाजपाचा उमेदवार होतो तो पक्षाच्या निर्णयाविरोधात जात नाही. ते भाजपाचे आणि युतीचे उमेदवार होते. त्यांच्यासंबंधी ही शंका घेण्याची गरज नाही”.

राज ठाकरेंनी फेटाळली होती भाजपाची विनंती

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.

रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार होण्याने रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखरीच शांती मिळेल. यामुळेच भाजपाने ही निवडणूक लढवू नये व त्यांच्या पत्नी निवडून येतील असे पाहावे, असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं.

राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजपा नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या होत्या. रविवारी रात्री फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते. भाजपाचं स्थानिक नेतृत्व ही जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवलं होतं. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

शरद पवार आणि प्रताप सरनाईक यांनीही केलं होतं आवाहन

अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या ऋुतुजा लटके आणि भाजपाचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार होती. लोकप्रतिनिधींचे निधन झाले व त्यांच्या कुटुंबातील कोणी पोटनिवडणूक लढवीत असल्यास शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा असल्याचे सांगत पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली होती. दुसरीकडे ‘बाळासाहेबांची शिवसेने’चे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं होतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *