Headlines

mla rohit pawar says difficult for bjp to break ncp like shivsena uddhav thackeray

[ad_1]

तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली आणि राज्यातलं उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं. तेव्हापासून राज्यात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आणि दुसरीकडे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. भाजपानं शिवसेना फोडली, असा आरोप आजपर्यंत अनेकदा ठाकरे गटासोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही केला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो, असं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

“..म्हणून राष्ट्रवादी पुढचं टार्गेट!”

शिवसेनेत फूट पाडल्यानंतर आता भाजपाचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना केला आहे. “शिवसेना एक मोठा पक्ष होता. त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून, राजकारण करून तो पक्ष फोडण्यात आला. पण दुसरं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो हे मी बोललो होतो. कारण शिवसेनेनंतर दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असलं, तरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं शक्य नाही. कारण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे चालत आहोत.एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे कितीही प्रयत्न केले, तरी त्यांना यश येणार नाही. पण ज्यांना लोकशाही माहीत नाही. दडपशाही, फोडाफोडी माहिती आहे, त्यांचं दुसरं टार्गेट कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस असेल. कारण तोच दुसरा मोठा पक्ष आहे”, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.

“शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव,” रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…”

काय म्हणाले होते रोहित पवार?

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला होता. “आमची सर्वांची उद्दिष्ट स्पष्ट आहेत. सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना आणि मला राज्यात सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांनी ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रमाणे त्यांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो”, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना अजित पवारांनी रोहित पवार यांना नेमकं काय म्हणायचं आहे, ते विचारतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *