Headlines

मित्रासोबत इंटिमेट होणं अभिनेत्रीला महागात; Abortion नंतर ही काय अवस्था?

[ad_1]

मुंबई : ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री कुब्रा सैत हिनं फॅशन जगतात नवा ट्रेंड आणला. तिच्या सौंदर्यावर बरेचजण भाळले. भूमिकांच्या निमित्तानं कुब्रा जितकी बोल्ड दिसली, तितकीच ती वैयक्तिक आयुष्यातही बोल्ड आहे. 

जीवनात तिनं असे काही निर्णय घेतले, जे पाहता तिच्या जागी इतर कुणी असतं तर नेमकं काय घडलं असतं याचा विचारही करणं अशक्य. ‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’ या पुस्तकातून तिनं आपल्या खासगी आयुष्यातील काही प्रसंग सर्वांसमोर आणले. 

लैंगिक शोषणापासून आपण कशा प्रकारे बॉडी शेमिंगचा शिकार झालो, इथवरची माहिती तिनं या पुस्तकाच्या माध्यमातून दिली. अनवॉन्टेड प्रेग्नेंसीवरूनही तिनं पडदा उचलला. (Actress Kubra Sait One Night Stand abortion)

आपण आई होण्यासाठी तयार नसल्याचं म्हणत गर्भपात करण्याचा निर्णय घेतल्याचा संदर्भ तिनं या पुस्तकात लिहिला आहे. कुब्रानं गर्भपाताचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कामाकडे मोर्चा वळवला. जीवनातील या वळणावरही ती खचली नाही. 

सहलीवर मित्रासोबत… 
2013 मध्ये वन नाईट स्टँडनंतर आपण गरोदर राहिल्याचा गौप्यस्फोट कुब्रानं तिच्या या पुस्तकातून गेला. त्यावेळी तिचं वय 30 वर्षे इतकं होतं. अंदमानला गेलं असता तिथं मद्यधुंद झाल्यानंतर मित्रासोबत ती इंटिमेट झाली होती. काही दिवसांनंतर जेव्हा तिनं प्रेगन्सेंसी टेस्ट केली, तेव्हा आपण गरोदर असल्याची बाब तिच्या लक्षात आली. 

हल्लीच दिलेल्या मुलाखतीतही तिनं या मुद्द्यावरही वक्तव्य केलं. ‘बहुधा मी तेव्हा त्यासाठी (मातृत्त्वासाठी) तयार नव्हते. किबंहुना मी आताही तयार नाहीच आहे. वयाच्या 23 व्या वर्षी लग्न, 30 व्या वर्षी मुलंबाळं हे महिलांवर असणारं दडपण मला समजतच नाही’, असं म्हणत आपल्या या निर्णयामुळं कोणतीही पश्चातापाची भावना मनात घर करत नसल्याचं तिनं स्पष्ट केलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *