Headlines

माईंड इट! रजनीकांतसोबतच ‘या’ Bollywood कलाकारांमुळं चष्म्याचीही फॅशन ट्रेंडमध्ये

[ad_1]

Black Glasses Trend in Bollywood: बॉलिवूडमध्ये अनेक स्टाईल्स या लोकप्रिय आहेत. उदाहरणार्थ, चालण्याची स्टाईल जशी की संजय दत्त यांची आहे. त्यातून बोलण्याची स्टाईल जशी की बिग बी अमिताभ बच्चन यांची आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यांच्या या स्टाईलला फॉलो करणारेही प्रचंड फॅन्स आहेत. त्यातून कपड्यांची स्टाईलही आपल्या तितकीच लक्षात राहते. तुम्हाला माहितीये का की चष्मा लावण्याची स्टाईलही फारच लोकप्रिय झालेली आहे. परंतु अनेकांच्या या गोष्टी लक्षातही आल्या नसतील. आताही आपल्यालाही कदाचित ते आठवणार नाहीत. बॉलिवूडच्या अशाच काही लोकप्रिय चित्रपटांतून चष्म्याची स्टाईल फारचं लोकप्रिय झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया यातील काही चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या लोकप्रिय चष्म्यांच्या स्टाईल्सबद्दल. तुम्हालाही जाणून घेऊन आश्चर्य वाटेल आणि मज्जाही येईल. यामध्ये ‘हा’ अभिनेता आघाडीचा होता. 

रजनीकांत : 

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यातून त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होताना दिसते आहे. यावर्षी त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्याचसोबत या चित्रपटातील त्यांचे आणि तमन्ना भाटिया हिचे गाणंही लोकप्रिय झाले होते. ‘कव्वाल्ला’ हे गाणं प्रचंड गाजले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. 33 वर्षांची तमन्ना आणि 72 वर्षांचे रजनीकांत अशी त्यांची जोडीही हीट झाली. त्या चित्रपटातूनही त्यांनी आपल्या चष्मा लावण्याचा ट्रेण्ड कायमच ठेवला होता. त्यातून या कव्वाल्ला गाण्यात त्यांची चष्मा उडवण्याची स्टाईल ही कायम आहे. 70-80 च्या दशकात रजनीकांत यांची ही स्टाईल प्रचंड लोकप्रिय झाली होती. आताही त्यांची चष्मा उडवण्याची स्टाईल ही प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे चष्म्याची स्टाईल चित्रपटातून फेमस करणारे हे पहिलेच सुपरस्टार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये ज्यांच्या या स्टाईलची आजही चर्चा होताना दिसते. 

सलमान खान : 

सलमान खान याचा ‘दबंग’ हा चित्रपट आला होता तेव्हाही त्याचा हार्ट शेपवाला तो काळा चष्मा भलताच व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली होती. त्याची ही स्टाईल तेव्हा प्रचंड व्हायरल झाली होती. तेव्हा सोशल मीडिया होते परंतु आजच्यासारखे ताकदवान नव्हते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असायची. त्यावेळी तेव्हा फॅनबेसमध्ये ही स्टाईल प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यातून आताही सलमान खानची ही स्टाईल आजही लोकप्रिय आहे. त्यातून मागच्या कॉलरला चष्मा लटकवायची त्याची स्टाईलही प्रचंड लोकप्रिय झाली होती. 

गोविंदा : 

गोविंदाही आपल्या अनेकदा चष्म्यांमधून दिसला आहे. त्यावेळीही त्यांच्या या स्टाईलची चर्चा असायची. ‘दूल्हे राजा’ या चित्रपटात तर त्यानं एकाच वेळी चेहऱ्यावर चार चष्मे घातले होते. त्यामुळे त्याची ही स्टाईल चांगलीच चर्चेत होती. 

अनिल कपूर : 

‘वेलकम’ या चित्रपटातही अनिल कपूर याची स्टाईल ही विशेष गाजली होती. तेव्हा अनिल कपूर यांचा तो मधूनच उघडणारा चष्मा चांगलाच लोकप्रिय झाला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *