Headlines

माईक नाही, बंदूक हाती घेणार BTS फेम गायक; करणार लष्करात प्रवेश

[ad_1]

BTS singer Kim Seok Jin : दक्षिण कोरियाच्या बीटीएस बँडने आपल्या कामगिरीने जगभरातील लोकांना घायाळ केलं. बीटीएस बँडने त्यांच्या गाण्यांच्या जोरावर जगभरातील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. विशेषतः तरुण वर्गामध्ये बीटीएसचा असलेला क्रेझ पाहायला मिळतो. जर तुम्ही देखील बीटीएस बँडचे चाहते असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण बीटीएस बँडमधील एक गायक ग्रूपमधून बाहेर पडणार आहे. बीटीएसच्या सदस्याच्या ‘ब्रेक’मागचं कारण असणार आहे, कोरियातील अनिवार्य लष्करी सेवा. (kim namjoon)

बीटीएस गायक किम सियोक जिन (Kim Seok Jin)  पुढचे दोन वर्ष बँडपासून दूर राहणार आहे. फक्त दोन वर्षांसाठी किम सियोक जिन बीटीएस बँडपासून दूर राहणार आहे.  यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे लष्करी सेवा… लष्करी सेवेत दाखल होण्यासाठी किम सियोक जिनने केस देखील कापले आहेत. (jung hoseok)

लांब केस कापून किम सियोक जिनने मिलिट्री कटमध्ये स्वतःचा लूक बदलला आहे.  किम सियोक जिन स्वतःने आपल्या मिलिट्री लूकचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये गायक मिलिट्रीलूकमध्ये दिसत आहे. सध्या किम सियोक जिनचा नवा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (kim seok-joong)

वाचा | Confirm! सुनिल शेट्टीच्या घरी वाजणार सनई-चौघडे; लेकीच्या लग्नाची तारीख समोर

आता बीटीएस बँडमध्ये पुढचे काही वर्ष किम सियोक जिन दिसणार नसल्यामुळे चाहते भावुक झाले आहेत. पण लष्करी सेवेसाठी गायक रुजू होणार आसल्यामुळे त्याला शुभेच्छा देत आहेत. सध्या किम सियोक जिन त्याच्या निर्णयामुळे तुफान चर्चेत आहे. 

दक्षिण कोरियाचा कायदा

दक्षिण कोरियात प्रत्येक धडधाकट तरुणाने वयाची 30 वर्षं पूर्ण होण्यापूर्वी 18 ते 21 महिने लष्करात सेवा देणं बंधनकारक आहे.  जिन लवकरच 29 वर्षांचा होणार आहे. बीटीएस बँडमधील इतर गायक 28 वर्षांपेक्षा कमी आहेत. पण पुढच्या दोन बीटीएस बँडमधील प्रत्येक गायक लष्करी सेवेत भरती होणार आहे.  (Law of South Korea)

म्हणून बीटीएस बँडमधील सात गायकांनी लष्करी सेवा दिल्यानंतर 2025 नंतर सर्व गायक पुन्हा आपल्या गायनाने सर्व जगाचं मनोरंजन करतील असं म्हणायला हरकत नाही. बीटीएस सदस्य आंतरराष्ट्रीय स्टार असल्यामुळे त्यांनी सूट मिळावी असा सल्ला काही कायदे अधिकाऱ्यांनी सरकारला दिला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *