Headlines

‘मीही त्यातून…’ Karan Johar ला आजही सतावतोय भुतकाळ?

[ad_1]

Karan Johar Nishant Bhatt Jhalak Dikh La Ja: करण जोहरला बॉलीवूडमध्ये स्टार कीड्सला लॉन्च करतो आणि बाहेरच्या कलाकारांना बॉलीवूडमध्ये येऊ देत नाही म्हणून त्याच्यावर अनेकदा आरोप करण्यात आले आहेत. आत्ताही त्याच्यावर अनेक प्रकारे आरोप केले जात आहेत. कंगना राणावतनं करणला मुव्ही माफिया म्हणून संबोधलं होतं. करण जोहरला दोन जुळी मुलं आहेत. सेरोगसीद्वारे त्याला ही दोन मुलं झाली आहे. (karan johar shares his feeling in front of everyone after watching a dance peformance in jhalak dikh la ja show)

सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणारा करण जोहर यावेळी मात्र वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आला आहे. सध्या करणचा एक इमोशल व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामुळे करण जोहरचे चाहतेही काळजीत पडले आहेत. सध्या टेलिव्हिजनवरती झलक दिख ला जा या  रिएलिटी शोनं सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या शोमधून अनेक उत्तोमोत्तम डान्सर्स आपल्या डान्सचा जलवा दाखवत आहेत. सध्या या शोचा नवीन प्रोमो रिलिज झाला आहे. हा प्रोमो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 

आणखी वाचा – करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

टीव्हीवर ‘झलक दिखला जा 10’ या शोमधून स्पर्धक निशांत भट्टचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. हा परफॉर्मन्स LGBTQ+ समुदायाला समर्पित केलेला असेल. यातून निशांत त्याच्या दडपलेल्या जीवनाचे चित्रण डान्समधून करणार आहे. यावेळी त्याचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा परफॉर्मन्स पाहून करण जोहर थक्क झाला. करण, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही ‘झलक दिखला जा 10’ चे जजिंग करत आहे. 

समाजातील LGBTQ+ समुदायाला समाजाची उपेक्षा कशी सहन करावी लागते हे निशांतने आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहे. त्याचा हा डान्स पाहून सगळेच भावुक झाले. विशेषतः करणला स्वतःला सांभाळता आले नाही. त्याच्या भावना दाटू आल्या, डान्सबद्दल आपली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला…मी स्तब्ध झालोय तुझा परफॉर्मन्स पाहून… कारण मीही कधीकाळी त्या वाटेवरून गेलो आहे. 

आणखी वाचा – आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले…

करण जोहरने यापुर्वी  LGBTQ+ समुदायावर आपलं मतं मांडलं आहे. ‘झलक दिखला जा 10’ या शोमध्ये निशांतची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तो एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. अनेक रिएलिटी शोजमधून त्यानं भुमिका निभावल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *