Headlines

मध्यावधी निवडणुका होतील असं का म्हणालात? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले “अचानक पंतप्रधानांच्या तोंडी…” | Shivsena Uddhav Thackeray on Statement of Maharashtra Mid Term Election PM Narendra Modi sgy 87

[ad_1]

महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान हे विधान करण्यामागे नेमकं काय कारण होतं यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाष्य केलं आहे.

Andheri By Poll: ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मशाल भडकली आणि…”

अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर पोहोचल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठय़ा घोषणा करायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्येही त्यांनी मोठे प्रकल्प व गुंतवणुकीच्या घोषणा केल्या व निवडणुका जाहीर झाल्या. राज्यातील सरकारमध्ये अस्थिरता असून काही आमदार नाराज असून फुटण्याचा विचार करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही काळाने अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांची शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आपले सरकार असताना केलेली कामगिरी घरोघरी पोचविण्याचे आवाहन ठाकरे यांनी केलं.

मध्यावधी निवडणुकांची शक्यता -उद्धव ठाकरे

…म्हणून मी तसं विधान केलं – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंना त्यांच्या विधानामागचं कारण विचारण्यात आलं असता ते म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येऊन येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे.

“मशाल भडकली, भगवा फडकला”

“कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्याची लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *