Headlines

FIFA : …म्हणून मेस्सीची अर्जेंटिना हरली तर ‘या’ ब्रँडचं होणार करोडोंचं नुकसान!

[ad_1]

FIFA World Cup 2022 Final : कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) आज फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीनामध्ये (Argentina Vs France) अंतिम सामना रंगणार आहे. Lusail स्टेडियमध्ये हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यादरम्यान अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे सर्वांचेच लक्ष (Lionel Messi) असणार आहे. 

एकीकडे फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये सामना खेळवला जाणार आहे तर दुसरीकडे दोन कंपन्यांमध्येही स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत आदिदास (Adidas) आणि नायकी (Nike) हे ब्रँड्सही आमनेसामने असणार आहेत. याचं कारण म्हणजे जगभरातील विविध खेळांचे बाजार मूल्य हे 200 अब्ज डॉलर आहे. त्यामुळे हे दोन्ही ब्रॅंड्स खेळाच्या जगतात नाव मोठं करण्यासाठी सातत्याने स्पर्धेत असतात. तसेच दोन्ही कंपन्यांसाठी फुटबॉल ही मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ मार्केटिंगसाठी जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचा वापर करतात.

FIFA World Cup Trophy: कोणीही जिंकूदे; खरी वर्ल्डकप ट्रॉफी मिळणारच नाही, काय आहे कारण?

काय आहे इतिहास?

1950 मध्ये अदिदासने फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर फुटबॉल आणि अदिदास हा ब्रॅन्ड एक समीकरण बनले. 70 च्या दशकात, अदिदासने फिफा स्पर्धेसाठी स्पॉन्सरशीप गोळा करण्याचे काम केले. मात्र 1990 मध्ये नायकीनेही बाजारात एन्ट्री घेतली. नायकी कंपनीचा लोगो पहिल्यांदा 1994 मध्ये एखाद्या फुटबॉल संघाच्या जर्सीवर दिसला. त्यानंतर नायकी अदिदासच्या पुढे निघून गेली. 2002 मध्ये जेव्हा नायकीची जर्सी घालून ब्राझीलने फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही.

FIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?

ज्याची स्पॉन्सरशीप त्याच्या उत्पादनाच्या विक्रीतही वाढ

मार्केटिंग व्यतिरिक्त, दोन्ही कंपन्यांमध्ये बरेच काही पणाला लागले आहे. ऍथलेटिक इंटरेस्टच्या अहवालानुसार, 1990 मध्ये, जेव्हा नायकिने फुटबॉलमध्ये प्रवेश केला नव्हता, तेव्हा त्यांची फुटबॉलच्या संबंधित वस्तूंची विक्री 40 दशलक्ष युरो होती. त्याच वेळी, 2018 मध्ये, जेव्हा फ्रान्सने नायकिची जर्सी घालून फिफा विश्वचषक जिंकला तेव्हा कंपनीच्या फुटबॉलशी संबंधित वस्तूंची विक्री 2 अब्ज युरोच्या पुढे गेली.

शेअर मार्केटमध्येही मोठा उलटफेर

2018 वर्ल्ड कपमध्ये अदिदासने जर्मनीला स्पॉन्सरशीप दिली. पण जर्मनीचा संघ लवकर बाहेर पडला. त्यावेळी अदिदासचे शेअर्स 6 टक्क्यांनी खाली आले. त्याचवेळी फ्रान्सला नायकीने स्पॉन्सरशीप दिली होती. त्यावेळी फ्रान्स जिंकला आणि कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले.

या वर्षी कोण कोणाला सपोर्ट करत आहे?

यावेळी विश्वचषक स्पर्धेतील 32 पैकी 16 संघांना नायकी (Nike), 7 संघांना अदिदास आणि 6 संघांना प्युमाने (Puma) स्पॉन्सरशीप दिली आहे. यापैकी अंतिम सामन्यात खेळणाऱ्या फ्रान्सच्या संघाला नायकी आणि अर्जेंटिनाच्या संघाला अदिदासने स्पॉन्सरशीप दिली आहे. तर वर्ल्ड कपमध्ये, 48.9 टक्के खेळाडूंनी नायकी आणि 35.2 टक्के खेळाडूंनी अदिदासचे शूज घातले आहेत. त्यामुळे आता शेवटच्या सामन्यात खेळासोबत शूज आणि जर्सीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *