Headlines

‘मी फार हळवा नाही, पण हा सीन पाहताना…’, मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष

[ad_1]

Milind Gawali Instagram Post : आई कुठे काय करते ही मालिका कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर असते. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही कायमच टॉप 10 मध्ये असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत सध्या अभिषेक हा देशमुख कुटुंबाला सोडून कॅनडाला जात आहे, असे पाहायला मिळत आहे. यामुळे सर्व देशमुख कुटुंब हे भावूक झाले आहे. नुकतंच या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. 

मिलिंद गवळी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी अभिषेक हा देशमुख कुटुंबाबरोबर फिरायला जात असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबरोबर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

मिलिंद गवळींची पोस्ट

“कळत नकळत आपण नात्यांमध्ये गुंतत जातो आणि मग हे असे हळवे क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतात, माणसाच्या अशा आकांक्षा एकमेकांच्या विषयी वाढत जातात, आमच्या “आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये खूप से सीन्स “ करूण” रसाने भरलेले असतात, त्यातलाच हा अभि ज्या वेळेला कॅनडाला जायला निघतो, तेव्हाचा त्याचा, त्याच्या वडिलांबरोबरचा ,अनिरुद्ध बरोबरचा संवाद हा खूप ‘करूण‘रसाने भरलेला होता, उत्कृष्ठ लेखन आणि अतिशय सुंदर पद्धतीचं दिग्दर्शन, त्यात आमच्या या निरंजन कुलकर्णीने जीव ओतून अभिनय केला आहे. 

हळव्या मनाच्या माणसांना ते संवाद जाऊन थेट हृदयात भिडतोच, मी काही फार हळवा आहे असं मला वाटत नाही , पण हा सीन मी प्रेक्षक म्हणून बघताना मला ही भरून आलं, आपल्याला सतत माहिती असतं की ही नाती काही खरी खरी नाही आहेत, आपण अभिनय करत असतो, पण अभिनयामध्ये आपण ज्या भावनांचा उपयोग करतो त्या भावना तर खूपच खऱ्या खऱ्या असतात, आणि मग अशा करूण भावना जागृत झाल्या की मग खऱ्याखोट्याचं अंतर निघून जातात आणि ते आपल्या खऱ्या जीवनाचा भाग आहे असंच वाटायला लागतं, आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटायला लागतं त्यावेळेला बघणाऱ्याला म्हणजे प्रेक्षकाला पण ते खरं खरं वाटतं, मग नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, त्या अभिनेता विषयी आपल्याला आपुलकी वाटते, मनामध्ये त्या अभिनेत्याविषयी आपल्याला भरपूर प्रेम, आदर आणि माया निर्माण होतेय.

प्रेक्षक आणि कलाकार दोघांमध्ये निर्माण झालेल्या भावना या अतिशय pure पवित्र किंवा निर्मळ , असल्यामुळे बरेचसे मनाला भावलेले अभिनेत्याचे प्रसंग आयुष्यभर आपल्या मनात घर करून राहतात आणि मग तो कलाकार जन्मभर आपलासा वाटतो, माझा वाटतो, माझ्या घरचा वाटतो , माझ्या आयुष्याचा एक भाग असं वाटतं. किती वेगळी दुनिया आहे ही माझी , जी खरी नाही आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ती खरी नाही, पण आपलं अंतर्मन ती खोटी मानायला सुद्धा तयार नाही, तुम्ही सगळे तर प्रेक्षक म्हणून त्याच्याकडे पाहता, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल involve होऊन जातात, मी मात्र ते जगत पण असतो आणि प्रेक्षक म्हणून ते अनुभवत पण असतो .

नव रसा मधला हा करूण रस फारच सुंदर आहे, आणि मला असं वाटतं की ज्या माणसांच्या आयुष्यामध्ये करूणा आहे, ज्या माणसांच्या डोळ्यांमधून अश्रू सहज वाहत असतात, ती माणसं परमेश्वराच्या अगदी जवळची असतात, ज्या माणसांच्या डोळ्यात अश्रू येतात त्यांना माणूस म्हणून जगण्याचा खरा अर्थ समजलेला असतो, आणि जी माणसं कधी रडू शकत नाहीत, ती बंजर जमिनीसारखी असतात , जिथे कधीही काहीही उगवत नाही, निर्जीव असतात”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. 

दरम्यान मिलिंद गवळींच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करत आहे. अभिनेता अभिषेक देशमुखने या पोस्टवर कमेंट करत हात जोडल्याचा इमोजी पोस्ट केला आहे. तर अभिषेकची भूमिका साकारणारा निरजंन कुलकर्णीनेही कमेंट केली आहे. खरंच कमाल लेखन, दिग्दर्शन आणि तुमच्यासोबतच वडील मुलाचं नातं… खूपच मस्त, अशी प्रतिक्रिया निरंजन कुलकर्णीनी दिली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *