Headlines

मॅच हरल्यानंतर हार्दिक पांड्या रागाने लालबुंद, ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

[ad_1]

मुंबई : गुजरातचे कर्णधार हार्दिक पांड्याला शेवटच्या ओव्हरमध्ये सामना गमवण्याची वेळ होती. आयपीएलच्या 15 व्या सामन्यात गुजरातच्या मुंबई टीमकडून 5 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या रागाने लालबुंद झाल्याचं पाहायला मिळालं.

शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला 9 धावांची आवश्यकता होती. मात्र दोन खेळाडू रनआऊट झाल्याने त्याचा मोठा तोटा गुजरातला झाला. शेवटच्या ओव्हरवेळी हार्दिक पांड्या आणि राहुल तेवतिया रनआऊट झाले. 

डेनियल सॅम्सने शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करून मुंबईला विजय मिळवून दिला. गुजरातला विजयासाठी 9 धावा आवश्यक होत्या. सॅम्सने 18 धावा देऊन तेवतियाला रनआऊट केलं. 

हार्दिक पंड्या पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं. ‘मला वाटतं की फलंदाजांकडून खूप अपेक्षा होती मात्र निराशा झाली. तुम्ही T20 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना सतत करू शकत नाही. यासाठी कोणाला दोष देऊ शकत नाही, कारण असे सामने आम्ही जिंकले आहेत.’ 

‘आमच्याकडूनही काही चुका झाल्या, ज्याचा फटका टीमला बसला आणि मुंबईचा फायदा झाला. 19.2 ओव्हरमध्ये आम्ही चांगलं लक्ष्य गाठत असताना जे नको तेच घडलं. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडं कमी पडलो आणि तिथेच 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 

हार्दिक पांड्याने बॉलर्सचं कौतुक केलं आहे. मुंबईला 170 धावांवर रोखून त्यांनी खूप चांगलं काम केलं. नाहीतर आमच्यासमोर खूप मोठं धावसंख्येचं आव्हान राहिलं असतं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *