Headlines

लग्नाविषयी मित्रांनीच भरले कान अन् आजन्म अविवाहित; ज्येष्ठ अभिनेत्याची अधुरी प्रेम कहाणी

[ad_1]

Sanjeev Kumar Marriage: बॉलिवूडमध्ये चित्रपटांपेक्षा चर्चा असते ती म्हणजे बॉलिवूडमध्ये सुरू असणाऱ्या रिलेशनशिप्सची. हे काही आताच्याच पिढीमध्ये आहे असं नाही. सत्तर, ऐंशीच्या दशकातही फिल्म मॅगझीन्स आणि टीव्हीमधून ही चर्चा चांगलीच असायची. मोठमोठे सुपरस्टारही याला अपवाद नाहीत. अभिनयाबद्दल अभिनेत्यांची कायमच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्याची जोरात चर्चा आहे ती म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार. वयाच्या 47 व्या वर्षीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांच्या अभिनयाचे आजही सर्वच जण फॅन्स आहेत.  त्यांचे चित्रपट हे आजही आवडीनं पाहिलं जातात. त्यांचे अनेक चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात. 

70-80 च्या दशकात संजीव कुमार हे नावं प्रचंड लोकप्रिय होते. त्यांनी ‘शोले’, ‘पती पत्नी ओर वो’, ‘आंधी’, ‘अंगूर’, ‘खिलोना’, ‘त्रिशूल’, ‘अनामिका’ असे अनेक लोकप्रिय आणि बहुचर्चित सिनेमे केले. आपल्या व्यावसायिक आयुष्यात त्यांनी मोठं यश मिळवलं परंतु त्यांचे व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढउतार आले. ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा अविवाहित होते. परंतु त्यांनी लग्न नक्की का केले नव्हते. या लेखातून आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. 

संजीव कुमार हे प्रचंड हॅण्डसम होते आणि त्यांच्यामागे अनेक सुंदर मुलीही फिदा होत्या. त्यांच्याशी लग्न करण्यासाठीही अनेक मुलींनी रांगा लावलेल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार असं कळते की, त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मनात काही गोष्टी या भरवल्या होत्या. ती गोष्ट अशी होती की मुली या त्यांच्या सौंदर्यावर किंवा त्यांच्या चार्मिंग पर्सनॅलिटीवर नाही तर त्यांच्या पैशांवर आणि संपत्तीवर प्रेम करतात. कदाचित हेच ते कारण ठरलं असेल की संजीव कुमार हे काही कोणत्या मुलीच्या प्रेमात पडले नाही आणि आजन्म अविवाहित राहिले. असे समजले जाते. 

हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांचे कलेक्शन

असंही म्हणतात की संजीव कुमार हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते. त्यातून संजीव कुमार हे हेमा मालिनीच्या प्रचंड प्रेमात होते, इतके की ते त्यांच्याशी लग्नही करू इच्छित होते. परंतु त्यात ते काही यशस्वी झाले नाहीत. असंही म्हणतात की हेमा मालिनी यांच्या घरीही ते त्यांच्या आईसोबत गेले होते. लग्नाचे पक्केही झाले होते. परंतु संजीव कुमार यांच्या आईची अशी इच्छा होती की हेमा मालिनी यांनी लग्नानंतर चित्रपटात काम करू नये. परंतु ही गोष्ट हेमा मालिनी यांना पटली नाही. त्यांनी लग्नच मोडले. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *