Headlines

मलायकाच्या खासगी क्षणांचा लपूनछपून काढलेला Video Viral! लोक म्हणाले, ‘थोडी लाज..’

[ad_1]

Malaika Arora Viral Video: अभिनेत्री मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. मलायकाचा हा व्हिडीओ शनिवारी शूट करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडीओ आता वादात अडकला असून या व्हिडीओवरुन प्रसारमाध्यमांवर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी तारतम्य बाळगणं गरजेचं असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

नक्की घडलं काय?

झालं असं की, रविवारी मलायका अरोरा तिच्या काही मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. यावेळेस मलायकाने व्हाइट रंगाचा जम्पसूट घातला होता. मात्र मलायचा तिच्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी आल्याचं समजल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणजेच पापाराझींनी तिची एक झळक कॅमेरात टीपण्यासाठी धडपड सुरु केली. मलायका ज्या ठिकाणी आली होती तेथून काही अंतरावरुन या पापाराझींनी तिच्या नकळत तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरुवात केले. यापैकीच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरुन चाहते चांगलेच संतापलेत.

मलायकावर झूम केला कॅमेरा

व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका तिच्या मित्र-मैत्रिणींची भेट घेताना दिसत आहे. मलयाकाने शॉर्ट बॅकलेस व्हाइट जम्पसूट परिधान केला आहे. हेअर स्टाइल तीने अगदी साधी ठेवली असून केसांचा बन करुन तो वर बांधल्याचं दिसत आहे. या भेटीगाठीनंतर मलायका आपल्या खुर्चीवरुन उठून निघत असताना ड्रेस ठिक करताना दिसत आहे. यावेळेस प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मलायकावर कॅमेरा झूम करण्यास सुरुवात केली. मलायका बसलेल्या ठिकाणी असलेल्या खिडकीमधून झूम करत तिची झलक रेकॉर्ड करण्याचा प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा प्रयत्न होता. 

मलायकाला समजलं तेव्हा…

अचानक मलायकाला पापाराझींच्या कॅमेरांचं आपल्यावर लक्ष असल्याचं समजलं. तिने हात हलवून कॅमेरांकडे पाहत प्रतिसाद दिला. त्यानंतर तातडीने ती तिथून निघून गेली. आपल्या नकळत आपले व्हिडीओ आणि फोटो काढले जात असल्यावर मलायकाने थेट आक्षेप नोंदवला नाही. मात्र तिच्या अनेक चाहत्यांनी पापाराझींना चांगलेच फैलावर घेतलं आहे.

थोडी तरी लाज बाळगा

मलायकाच्या खासगी आयुष्यातील क्षण अशाप्रकारे तिच्या नकळत शूट करणं चुकीचं असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. “तुम्हाला काही वाटतं की नाही? थोडी तरी लाज बाळगा रे” असं एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने, “ही काही फारशी चांगली गोष्ट नाही. तुम्ही तिचे व्हिडीओ आणि फोटो काढत असल्याची तिला कल्पना नव्हती. जेव्हा सेलिब्रिटींना कॅमेरा त्यांच्यावर आहे याची जाणीव नसते तेव्हा फोटो, व्हिडीओ काढायला नको,” असं म्हटलं आहे. “भारतीय प्रसारमाध्यमांनी सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जागृक राहणं गरजेचं आहे. त्यांना खासगी आयुष्य जगण्याची मूभा दिली पाहिजे. अशाप्रकारे लपून व्हिडीओ काढून ते सार्वजनिक करणं चुकीचं आहे,” असं अन्य एकाने म्हटलंय.

सध्या जवळच्या व्यक्तींबरोबर घालवतेय वेळ

सध्या मलायका अरोरा तिचा मुलगा अरहान आणि जवळच्या मैत्रीणींबरोबर बराचसा वेळ घालवताना दिसते. यामध्ये तिची बहिणी अमृता अरोरा, करिना कपूर आणि करिष्मा कपूर यांचा समावेश असतो. अनेकदा सोशल मीडियावर या चौघेंचे एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *