Headlines

Makar Sankranti 2023: ढील दे दे रे! संक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

[ad_1]

Makar Sankranti 2023: वर्षाचा पहिला महिना, अर्थात (January 2023) जानेवारी महिना उजाडला की सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे एका अशा सणाचे ज्याचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वं खऱ्या आर्थानं मानवी आयुष्यासाठी फायद्याचं ठरतं. तुम्हाला माहितीच असेल की मकर संक्रांतीच्या पर्वादरम्यान, सूर्य धनु राशीतून मकर (Surya Transition) राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवसापासून सर्व शुभ कामांना सुरुवात होते. मकर संक्रांतीचा हा दिवस अनेक कारणांनी खास आहे. या दिवशी गंगास्नान केल्यानं पुण्यप्राप्ती होते अशी धारणा आहे. 

मकर संक्रांत म्हणजे शुभशकून आणि बरंच काही… (Makar sankranti mahurat)

मकर संक्रांत जवळ आली की घराघरांमध्ये तिळाचे लाडू वळण्याचा घाट घातला जातो. बच्चेकंपनी हे लाटू पटापट मटकवण्यासाठी धाव मारताना दिसते. त्यातच उत्सुकता असते ती म्हणजे पतंग उडवण्याची. 

देशभरात मकर संक्रांतीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पतंग (Importance of Flying kite) उडवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. सानथोर सर्वजण या स्पर्धांमध्ये सहभागी होतात गुजरातमध्ये (Gujarat) पतंगबजीचा उत्साह काही औरच. पण, ही पतंग का उडवली जाते माहितीये? 

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे मोठं कारण, एकदा पाहाच… 

मकर संक्रांतीला पतंग उडवली जात असल्यामुळं अनेक भागांमध्ये या पर्वाला पतंग पर्व असंही म्हणतात. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणांचा समावेश आहे. (South India) दक्षिण भारतात पौराणिक ग्रंथांनुसार खुद्द मर्यादापुरुषोत्तम श्रीरामानं पतंग उडवण्याची सुरुवात केली असा समज आहे. रामानं उडवलेली पतंग थेट इंद्रलोकी गेली आणि तेव्हापासून ही परंपरा सुरुच राहिली अशी इथं धारणा आहे. 

 

गोष्टीची दुसरी बाजू अशी की…. 

पतंग उडवण्यामागे असणाऱ्या वैज्ञानिक कारणाचा विचार करायचा झाल्यास या आगळ्यावेगळ्या खेळामुळं आपली प्रकृती उत्तम राहते. हृदय आणि मेंदुच्या कार्यक्षमतेमध्ये कमालीचं संतुलन पाहायला मिळतं. पतंग सहसा उन्हातच उडवली जाते, असं केल्यामुळं शरीराला मुबलक प्रमाणात विटामीन डी (Vitamin D) पुरवलं जातं. हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येत असल्यामुळं अशावेळी शरीरात मोठ्या प्रमाणआत सर्दी साठून राहते, कफ होऊ लागतो. त्यामुळं या परिस्थितीत मोकळी हवा आणि सूर्यकिरणं जणू जादूच करुन जातात. पतंग उडवण्यामागची ही कारणं एकिकडे आणि त्यातच ती उडवताना येणारी धमाल दुसरीकडे. हो पण, पतंग उडवत असताना आपल्या आनंदापोटी इतरांना, प्राणी, पक्षांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *