Headlines

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहला पश्चाताप; 14 वर्षानंतर ‘त्या’ चुकीच्या कृतीची झाली जाणीव

[ad_1]

मुंबई : आयपीएलमध्ये अनेक भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडल्याच्या घटना घडल्या आहेत. यात सर्वाधिक वादात राहीलेले प्रकरण म्हणजे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहचे, त्याने सामन्या दरम्यान एका प्रतिस्पर्धी भारतीय गोलंदाजाला कानशिलात लगावली होती. त्याच्या या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून मोठा वादही झाला होता. या वादावर आता हरभजन सिंहला पश्चाताप झाला असून त्या घटनेवर त्याने माफी मागितली आहे.  

नेमका वाद काय? 

IPL ची सुरुवात 2008 साली झाली होती. पहिल्याच हंगामात हरभजन सिंग आयपीएलच्या सर्वात मोठ्या वादाचा एक भाग बनला होता. हरभजनने वेगवान गोलंदाज एस श्रीशांतला मैदानातच थप्पड मारली. सामना हरल्यानंतर रागाच्या भरात हरभजन सिंगने हे कृत्य केले होते. ही घटना कोणीही विसरलेले नाही. या घटनेबद्दल त्यांनी नुकतीच खंत व्यक्त केली असून 14 वर्षांनंतर त्याने आपली चूक मान्य केली आहे.

आयपीएलच्या त्या पहिल्या हंगामात हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा भाग होता आणि एस श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता. आयपीएलमधील या घटनेनंतर हरभजनवर गामात बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर त्याच्यावर पाच एकदिवसीय सामन्यांचीही बंदी घालण्यात आली होती.

हरभजन सिंह काय म्हणाला? 

‘जे झालं ते चुकीचं होतं. माझ्याकडून चूक झाली होती. माझ्या चुकीमुळे माझ्या सहकाऱ्यांनाही मान खाली कराली लागली.मलाही त्याची लाज वाटली. जर मला एखादी चूक सुधारण्याची संधी मिळाली तर ती म्हणजे मी मैदानावर एस.श्रीशांतशी कसे वागलो. असे घडायला नको होते, असे हरभजन सिंह याने ग्लान्स लाईव्ह फेस्टमध्ये बोलताना सांगितले. 

एस श्रीशांतची कामगिरी

एस श्रीशांत हा भारताच्या स्टार वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. 2007 आणि 2011 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता. आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळत असे. 27 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, त्याने भारतासाठी 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 169 विकेट्स आहेत. एस श्रीशांतनेही आयपीएलमध्ये ४४ सामने खेळले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *