Headlines

“माझी पत्नी माझ्यावर चिडते, टीव्हीवर गांधी चित्रपट लागला की…”, राज ठाकरेंनी सांगितला शर्मिला ठाकरेंबाबतचा ‘तो’ किस्सा | Raj Thackeray tell funny incident of wife Sharmila Thackeray about watching Gandhi movie

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची पत्नी शर्मिला ठाकरेंबाबतचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. “टीव्हीवर गांधी चित्रपट लागला की माझी पत्नी तातडीने तो चॅनल बदलते आणि वेगळा चॅनल लावते,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच मी कित्येकदा गांधी चित्रपट पाहिला असला तरी पुन्हा गांधी चित्रपट सुरू असल्यावर मी पुन्हा पाहतो. त्यामुळे माझी पत्नी माझ्यावर चिडते, अशीही मिश्किल आठवण राज ठाकरेंनी सांगितली. ते रविवारी (१६ ऑक्टोबर) मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “मीही चित्रपट ‘व्हॉईस ओव्हर’ करण्याचा आनंद घेतला. कारण मी महाविद्यालयात असल्यापासून चित्रपट निर्मिती माझ्या आवडीचा भाग आहे. सध्या मी चित्रपट बघण्यापलिकडे काही करू शकत नसलो, तरी चित्रपट बनवणे हा माझ्या खूप जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. मी आजही चित्रपट बघत असताना तो चित्रपट आवडला तर वेगवेगळ्या अंगाने बघतो.”

“माझी पत्नी माझ्यावर चिडत असते”

“माझ्या याच सवयीमुळे मी गांधी चित्रपट किती वेळा पाहिला असेल याची माझी मलाही कल्पना नाही. माझी पत्नी माझ्यावर चिडत असते. टेलिव्हिजन चॅनल बदलत असताना चुकून गांधी चित्रपट लागला, तर ती पटकन पुढचा चॅनल लावते. कारण मला तो गांधी चित्रपट दिसला तर मी परत बघायला बसेन. म्हणून ती चॅनल पटकन बदलते. मात्र, मला त्या गोष्टींची आवडच आहे,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

“केवळ दिग्दर्शक असतो म्हणून चित्रपट नसतो”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “अॅनिमेशन, चित्रपट यांची मला आवड असल्याने मी चित्रपटाचा व्हॉईस ओव्हर आनंदाने दिला. असं नाही की त्यांनी मला काही तरी सांगितलं आणि मी बोललो आहे. चित्रपट सामूहिक प्रयत्नांचं अपत्य असतं. केवळ दिग्दर्शक असतो म्हणून चित्रपट नसतो. कोणती गोष्ट कोठे असावी ही दिग्दर्शकाची दूरदृष्टी असते.”

हेही वाचा : राज ठाकरे अंधेरी निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देतील का? अरविंद सावंत म्हणाले, “मनसेने…”

“उत्सुकतेतून मी व्हॉईस ओव्हरचं काम केलं”

“यात कलाकार, साऊंड इफेक्ट, बॅकग्राऊंड स्कोअर असतो, गाणी असतात, डीओपी असतो. त्या सर्व प्रयत्नांपैकी व्हॉईस ओव्हर हा एक प्रयत्न आहे. तो प्रत्येक चित्रपटाला असतोच असं नाही. ती गोष्ट काय असते या उत्सुकतेतून मी ते काम केलं,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *