Headlines

…म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम शहाजीबापू पाटलांना पाठवली साडी | NCP sends saari to eknath shinde group member shivsena mla shahaji bapu patil scsg 91

[ad_1]

“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील हे सध्या या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी केलेल्या एका विधानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने शहाजीबापूंना साडी पाठवली आहे. सोलापूरमधील राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीने शहाजीबापूंच्या पत्त्यावर ही साडी पाठवली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.

नक्की पाहा >> Photos: “पाया पडतो, भांडू नको…”; स्वत:च्याच लग्नात शहाजीबापूंनी पत्नीला सोन्याऐवजी दिलेले पितळ्याचे दागिने; कारण…

शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील त्यांची पत्नी रेखा यांच्यासहीत नुकतेच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आपल्या गावरान आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे मागील काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालेल्या शहाजीबापूंनी या कार्यक्रमात अगदी आपल्या पत्नीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत उखाणा घेतल्याचं पहायला मिळालं. मात्र याच पत्नीसंदर्भात बोलताना एका ऑडिओ क्लिपमध्ये शहाजीबापू पाटील यांनी पत्नीला साडीही घेता येत नाही असं विधान केलं होतं.

नक्की पाहा >> Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची तुफान फटकेबाजी; एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर

शहाजीबापू पाटलांच्या याच वक्तव्यावरुन आता सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून एकनाथ शिंदे गटातील आमदार असणाऱ्या शहाजीबापू पाटील यांना साडी पाठवण्यात आलीय. सोलापूरमधून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज ही साडी रेखा शहाजीबापू पाटील यांच्या नावाने कुरियर केली आहे. “पाटलाची बायको असून साडीही घेता येत नाही,” असं शहाजी पाटील एका व्हायरल कॉलमध्ये बोलले होते. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने शहाजी पाटलांना साडी पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं या महिलांनी सांगितलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *