Headlines

“…म्हणून जिल्हा परिषद सदस्यांनी बंडखोरी केली” विजयकुमार गावितांचं स्पष्ट विधान, म्हणाले… | Zilla Parishad members rebel guardian minister Vijayakumar Gavita statement rno news rmm 97

[ad_1]

नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांना चांगली वागणूक मिळाली नाही, म्हणून सदस्यांनी अविश्वास दाखवत बंडखोरी केली आणि भाजपाला पाठिंबा दिला. यामुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष विराजमान झाला , असं विधान आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी गावित म्हणाले की, मागील सरकारच्या काळात काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची विकासकामं केली नाहीत. जिल्हा परिषद सदस्यांनाही चांगली वागणूक दिली नाही. सरकारकडून जो निधी मिळायचा तो निधी पूर्णपणे खर्च केला जात नव्हता. हा शिल्लक निधी पुन्हा सरकारला पाठवला जायचा. यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य काँग्रेसवर नाराज होते.

हेही वाचा- “तुम्ही कसा काटा लावला होता? हे…” पुणे पाण्याखाली गेल्यावरून चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्र!

काँग्रेसला लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही. याच कारणातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. पहिल्या व दुसरा टप्प्यात चांगल्या ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. सध्या राज्य सरकारचं ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यावर विश्वास ठेवून लोकांनी भाजपाला मतदान केलं आहे. यामुळे आगामी काळात ग्रामपंचायतीच्या विकासासाठीही भाजपा कटिबद्ध असेल, असंही जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *