Headlines

Mahashivratri 2023: काय सांगता! गणपती आणि कार्तिकेयसह महादेवांना 8 मुलं होती? ‘ही’ त्यांची नावे; वाचा

[ad_1]

Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) सण. आजच्या दिवशी शंकरासाठी उपवास ठेवला जातो. या दिवशी शंकराची पूजा केली जाते. तसेच काल महाकाल आपल्या सर्व भक्तांवर आशीर्वाद ठेवतो. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शिव परिवाराची पूजा करण्याचे आहे. अनेकांना फक्त भगवान श्री गणेश आणि देवतांचे सेनापती कार्तिकेय यांना महादेवाचे पुत्र म्हणून ओळखतो. मात्र महादेवला इतर मुले देखील आहेत ज्यांची बहुतेक लोकांना माहिती नाही. पौराणिक कथेनुसार भगवान महादेव 8 मुलांचे पिता होते. ज्यांचे वर्णन शिवपुराणात आढळते.

 भगवान शिवाचे दोन पुत्र, कार्तिकेय आणि गणेश यांच्या व्यतिरिक्त, तिसरा मुलगा अयप्पा आहे, ज्याची दक्षिण भारतात पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. त्यांना 3 मुलीही आहेत. जाणून घेऊ त्यांच्याबद्दल. 

अशोक सुंदरी :  असे म्हटले जाते की आई पार्वतीने तिच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी अशोक सुंदरी नावाच्या मुलीला जन्म दिला. देवी पार्वतीला एक मुलगी हवी होती. मान्यतेनुसार अशोक सुंदरी ही देवी पार्वतीसारखीच सुंदर होती. त्यामुळे तिच्या नावापुढे सुंदरी जोडली गेली. माता पार्वतीने आपल्या एकाकीपणाचे दु:ख दूर करण्यासाठी तिला जन्म दिला, अशी अशोक या नावामागील श्रद्धा आहे. अशोक सुंदरीची गुजरातमध्ये विशेष पूजा केली जाते.
 
ज्योती किंवा माँ ज्वालामुखी : हे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या दुसऱ्या मुलीचे नाव आहे. पहिल्या मान्यतेनुसार देवी ज्योतीचा जन्म भगवान शंकराच्या तेजातून झाला होता. तिला त्याच्या आभाचं रूप मानलं जातं. दुसरीकडे, दुसर्‍या मान्यतेनुसार, पार्वतीच्या कपाळातून निघणाऱ्या तेजातून ज्योतीचा जन्म झाला. देवी ज्योतीचे दुसरे नाव ज्वालामुखी आहे, तिची तामिळनाडूतील अनेक मंदिरांमध्ये पूजा केली जाते.

वाचा: महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणते, वाचा आजचं पंचांग 
 
मनसा : तसेच देवी मनसाचा जन्म माता पार्वतीच्या पोटातून झाला नव्हता. बंगालच्या लोककथांवर आधारित मान्यतेनुसार, भगवान शिवाच्या वीर्याने कद्रूच्या पुतळ्याला स्पर्श केला तेव्हा तिचा जन्म झाला, जिला सापांची माता म्हणतात. म्हणून ती शिवाची कन्या मानली जाते.

जालंधर : महादेवाला जालंधर नावाचाही पुत्र होता. महादेवाने जालंधरला जन्म दिला. पण नंतर जालंधर त्यांचा सर्वात मोठा शत्रू बनला. पुराणानुसार जालंधर हा असुराच्या रूपात महोदवाचा एक अंश होता. इंद्राचा पराभव केल्यावर जालंधर तिन्ही लोकांचा देव बनला होता.

सुकेश : सुकेशला शिवपुत्र म्हणूनही ओळखले जाते. सुकेश अनाथ होता. त्याची आई व्यभिचारी असल्याने त्याच्या जन्मानंतर त्याच्या पालकांनी त्याचा सांभाळ केला नाही आणि सुकेश आपला मुलगा आहे यावर त्याच्या वडिलांचाच विश्वास नव्हता. पुराणानुसार, भगवान शिव आणि देवी पार्वतीने या अनाथ मुलाला पाहिले आणि त्याला संरक्षण दिले होते.

अंधकासुर : अंधकासुर हे पौराणिक राक्षसाचे नाव आहे. त्याचा वध भगवान शिवाने भैरवाच्या रूपात केला होता. अंधकासुर हा शिवाचा पुत्र होता. अंधकच्या वडिलांचे नाव हिरण्यक्ष होते. लिंगपुराणातील एका प्राचीन आख्यायिकेनुसार, एकदा भगवान शिव शंकर ध्यानात मग्न होते, त्याच वेळी माता पार्वतीने खेळकरपणे त्यांचे दोन्ही डोळे बंद केले. माता पार्वतीच्या हातातून घामाचा थेंब टपकला आणि भगवान शंकराच्या तिसर्‍या डोळ्याच्या दिव्य प्रकाशाला स्पर्श करून निघून गेली, त्याच घामाच्या आणि दिव्य प्रकाशाच्या मिश्रणातून एक बालक जन्माला आला जो आंधळा आणि कुरूप होता. हे बालक पुढे अंधकासुर म्हणून प्रसिद्ध झाले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *