Headlines

Maharashtracha Favourite Kon : महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता ठरला प्रसाद ओक

[ad_1]

मुंबई : झी टॉकीज (Zee Talkies) ही वाहिनी नेहमीच कलाकार आणि प्रेक्षक यांची नाळ जोडण्यासाठी पुढाकार घेत आली आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण (Maharashtracha Favourite Kon) हा पुरस्कार सोहळा. महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात कोणत्या कलाकाराने स्थान मिळवलं हे दाखवणारा महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार झी टॉकीज या वाहिनीच्या वतीने दिला जातो.

वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांकडूनच पसंतीचा कौल विचारून प्रेक्षकांनीच दिलेल्या मतांमधून महाराष्ट्रातील फेवरेट कलाकार आणि सिनेमा निवडला जातो त्यामुळेच प्रेक्षकांनाही आपल्या आवडीचा कलाकार झी टॉकीज वाहीनीचा ‘ महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा पुरस्कार घेताना पाहण्याचं पाहण्याचा एक वेगळाच आनंद मिळत असतो. रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी  दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७  वाजता हा दिमाखदार सोहळा पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे . 

यावर्षीही झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्काराची उत्सुकता संपत असून रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी  दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७  वाजता हा दिमाखदार सोहळा पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे . यावर्षी १२ विभागातून प्रेक्षकांनी निवडलेल्या कलाकारांना आणि उत्कृष्ट सिनेमाला महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा किताब बहाल करण्यात  येणार आहे .  

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा, अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, खलनायिका ,सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, संगीतकार ,गायक ,गायिका, याचबरोबर महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर आणि स्टाईल हे दोन विशेष पुरस्कार झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या सोहळ्याच्या मंचावर दिले जाणार आहेत.

आजपर्यंत सिनेमात राजकीय विषय अनेक निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी हाताळला आहे.  यामध्ये गेल्यावर्षी पडद्यावर आलेला शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनपटावर बेतलेला धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे (dharmaveer) हा सिनेमा. या सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेता प्रसाद ओक याने अफलातून किमया केली.  

प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या व्यक्तीवर सिनेमा बनवणे हे आता काही नवीन नाही पण ती व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब साकारणं हे नक्कीच प्रसाद ओक याच्यासमोर आव्हान होतं आणि ते आव्हान त्याने लिलया पेललं . त्याची पोचपावती या सिनेमाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईने दाखवून दिलीच पण आनंद दिघे या भूमिकेसाठी प्रसाद ओक याने घेतलेली मेहनत यावर देखील प्रेक्षकांनी त्यांच्या पसंतीची मोहर उमटवली. धर्मवीर या सिनेमात आनंद दिघे यांच्या साकरलेल्या भूमिकेसाठी प्रसाद ओकला  (Prasad Oak) सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुसस्काराने सन्मानित करण्यात आलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *