Headlines

maharashtra womens commission rupali chakankar send notice sambhaji bhide women journalist controversy statement ssa 97

[ad_1]

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच आता संभाजी भिडे यांनी आणखी एक विधान केलं आहे. संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला बोलण्यास नकार दिला. त्यामुळे भिडे यांनी महिला पत्रकाराचा अपमान केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.

हेही वाचा : “…तर त्या अधिकाऱ्याला उघडंनागडं करून मारल्याशिवाय सोडणार नाही”, राजू शेट्टींचा इशारा

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संभाजी भिडे यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्याने मुलं होतात’, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे,” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

हेही वाचा : राज ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार?, राजकीय आखाडा तापण्याची शक्यता

“ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसेच, संभाजी भिडेंना महिला आयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा,” असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *