Headlines

महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजे – भाजपा आमदार प्रशांत बंब यांचं विधान!

[ad_1]

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत स शिक्षक संघटनां आक्रमक झाल्याचे दिसत आहे. काही दिवसच अगोदर वैजापुरमध्ये काही शिक्षक संघटनांनी समन्वय समिती स्थापन करून मोर्चा देखील काढला होता. या मोर्चामध्ये शिक्षक संघटनांशी संबंधित ६०० ते ७०० शिक्षक सहभागी झाले होते. या संदर्भाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले होते. हे प्रकरण तापलेलं असताना, आता विधानपरिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करून प्रशांत बंब यांनी नव्या वादाला तोंड फोडल्याचे दिसत आहे. घरभाडे भत्त्यावरून केलेल्या मागणीमुळे राज्यभरातील शिक्षक चिडलेले असताना, आता बंब यांच्या या नव्या मागणीवर पदवीधर आमदारांनी देखील आक्षेप घेतला आहे.

“महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ बंद केले पाहिजेत, २० वर्षांपूर्वीच खरंतर हे बंद व्हायला हवे होते. त्याऐवजी दुसरे कोणते मतदारसंघ पाहिजेत, याचा सर्वांनी मिळून विचार करावा. मी जबाबदारीने सांगतोय की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील बहुतांश आमदार हे शिक्षकांना खोटा पाठिंबा देतात. जे आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत ठरतील. असं आमदार प्रशांत बंब यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

पाच सप्टेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात रस्त्यावर येणार आहेत. याशिवाय शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देखील प्रशांत बंब यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

मग तुम्हाला खोटी कागदपत्र लावण्याचं काय कारण? –

आमदार प्रशांत बंब म्हणाले, “मी जे बोललो त्याविरोधात आंदोलन करणं, म्हणजेच माझं बोलणं किती खरं आहे आणि किती यांना लागलेलं आहे, असं दिसतं. यामधून माझा माघार घेण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही, कोणत्याही पातळीवर होत नाही. मी हे बोललो की, तुम्ही ज्या गावात राहण्याची कागदपत्रं दाखल करतात परंतु तुम्ही त्या गावात राहत नाहीत. म्हणजेच काय, शिक्षकांकडून खोटी कागदपत्र तयार करणं हा गुन्हा नाही का? हा फौजदारी स्वरुपाचा कार्यक्रम तुम्ही करून देखील, जर अशाप्रकारे भाड्याची रक्कम उचलत असतील आणि यांचं म्हणणं काय आहे तर, आम्ही तिथे किंवा नाही परंतु हा आमच्या पगाराचाच भाग आहे. मग तुम्हाला खोटी कागदपत्र लावण्याचं काय कारण? असा माझा साधा प्रश्न होता. याविरोधात हे सगळेजण उठले आहेत. ही यांची चाल आहे. आजपर्यंत गावात हे शिक्षक मतदारसंघ किंवा पदवीधर मतदार संघातील जे शिक्षक आहेत, ते यांच्या पाठबळामुळे हे वरपर्यंत चालले आहेत. जनतेने जर थोडा जरी आवाज उचलला आणि आमच्या गावात तुम्ही का येत नाही असं विचारलं तर लगेच त्यांच्यावर ३५३ कलम लावणार. विविध गुन्हे लावणार, अब्रनुकसानीचे गुन्हे नोंदवणार. म्हणजे कोणाला बोलूच द्यायचं नाही. हे सगळं या शिक्षक मतदारसंघाच्या आमदारांमुळे होत आहे. हे सगंळ आपल्याला बंद करावं लागेल.”

आमच्या पिढ्या बरबाद नाही झाल्या पाहिजे –

तसेच, “अगोदर काय होतं, ३ टक्के सुशिक्षित लोक त्या विधानभवनात असायचे.म्हणून शिक्षक आणि पदवीधऱ मतदारसंघ निर्माण झालेले आहेत. आता सगळेच आम्ही सुशिक्षित आहोत. आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची आवश्यकता नाही. यांच्यामुळे आमच्या पिढ्या बरबाद होत आहेत. कारण, प्रत्येक पालक तिथे येऊन विरोध करू शकत नाही, हे यांचा शासनावर दबाव वापरतात आणि शिक्षकांवर कारवायाच होऊ देत नाहीत. शिक्षक लोक अवैध संघटना चालवतात, त्यांना हे पाठबळ देतात, त्यांच्या संघटनांमध्ये हजर राहतात. म्हणजेच तुम्ही शिक्षणाचं बाजारीकरण करणार का? आमच्या पिढ्या बरबाद नाही झाल्या पाहिजे.” असंही प्रशांत बंब यांनी यावेळी बोलून दाखवलं.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *