Headlines

maharashtra political crisis eknath shinde reinstated as shiv sena legislative party leader zws 70

[ad_1]

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदानावरून शिवसेना आणि शिंदे गटाने परस्परांचे आमदार अपात्र ठरविण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने शिवसेनेतील हा कायदेशीर वाद आणखी विकोपाला जाईल, अशी चिन्हे आहेत. दोन्ही गटांच्या आमदारांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याची नोंद पीठासीन अधिकाऱ्यांनी रविवारी विधानसभेत घेतली.  

उभयतांमध्ये हा संघर्ष सुरू असतानाच नव्या अध्यक्षांनी शिवसेना पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी सुनील प्रभू यांची झालेली नियुक्ती रद्द करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड कायम ठेवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश लागू केले होते. सर्व ५५ आमदारांना उभय बाजूंकडून पक्षादेशाचे पालन करावे, असे बजावण्यात आले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या १६ आमदारांनी राजन साळवी यांना, तर शिंदे गटाच्या ३९ आमदारांनी नार्वेकर यांना मतदान केले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बहुतांश शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केले आहे, असे नमूद केल़े  शिवसेनेच्या सदस्यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केले आहे, याची दखल घेत असल्याचे झिरवळ यांनी जाहीर केले.

शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी सांगताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावध झाले. त्यांनी कामकाज सुरू असतानाच शिंदे गटातील दीपक केसरकर आणि भरत गोगावले यांना पत्र देण्याची सूचना केली. त्यानुसार शिंदे गटाने पत्र दिले. अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याची नोंद घेतल्याचे जाहीर केले. त्याला शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. ही प्रक्रिया पार पडली तेव्हा आपण अध्यक्ष नव्हता, याकडे जाधव यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधले. शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी पक्षादेशाचा भंग केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी याचिका शिवसेनेच्या वतीने अध्यक्षांकडे सादर करण्यात आल्याचे शिवसेना खासदार अरिवद सावंत यांनी जाहीर केले. दुसरीकडे, शिवसेनेच्या १६ आमदारांनी पक्षादेश पाळलेला नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेना-भाजपचे सरकार असा भाषणात उल्लेख केला. सभागृहात हा वाद सुरू असतानाच शिंदे गट विधान भवनातील तिसऱ्या मजल्यावरील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्याची भीती लक्षात  घेता शिवसेनेच्या मागणीवरून हे कायार्लय बंद करण्यात आले होते. पण, हे कायार्लय सोमवारी उघडेल, असे खासदार सावंत यांनी सांगितले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी पद्धतीने मतदान झाल्याने कोणत्या आमदाराने कोणाला मतदान केले हे स्पष्ट झाले. या साऱ्या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात झाले. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवरील याचिकेत या कामकाजाचा वापर केला जाणार आहे. अध्यक्षपदी भाजपचे नार्वेकर हे निवडून आल्याने शिंदे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण शिवसेनेने शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता केलेल्या अर्जावर आता नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होईल. 

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर : विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांना १६४, तर शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळाचा अंदाज आल्याने आज, सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाची केवळ औपचारिकता उरली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *