Headlines

Maharashtra News Live Updates in Marathi | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Murji Patel vs Rutuja Latke Andheri Bypoll Election Result

[ad_1]

Mumbai News Live Updates, 04 November 2022 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली. तर यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिजे राजकारणी ठरले आहेत.

राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केलं आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दोन्ही नेते लवकरच फोनवरुन चर्चा करणार असून यानंतर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संभाव्य युतीवर टीका केली असून आम्ही त्यांचा सामना करु असं म्हटलं आहे.

राज्यातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचा केवळ एकाच क्लिकवर

Live Updates

Live Marathi News Today, 04 November 2022 : राज्यातील विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी सविस्तर वाचा केवळ एकाच क्लिकवर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *