Headlines

Maharashtra news live pune rain updates eknath shinde narendra modi uddhav thackeray marathi news

[ad_1]

Mumbai-Pune Latest News Live, 18 Oct 2022 : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. काल(सोमवारी) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थक खासदारांपैकी एक असलेल्या राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. तसेच आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असंही विचारे यांनी म्हटलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा वेगवान आढावा

Devendra Fadanvis

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने या निवडणुकीसंदर्भातील चर्चा दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचं मुख्य कारण भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक हे आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *