Headlines

Maharashtra latest news diwali 2022 celebration mumbai pune thane live news updates | Today’s Political headline 

[ad_1]

Marathi News Live Today, 21 Oct 2022 : राज्यात अडीच वर्षांपूर्वा महाविकास आघाडीच्या निमित्ताने नवं राजकीय समीकरण पहायला मिळालं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि आणखी एक नवा राजकीय प्रयोग पहायला मिळाला. दरम्यान आता राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढणारी जवळीक पाहता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच आज हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.

अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. फोन टॅपिंग ज्या कालावधीत झालं, त्यावेळी राज्यात निवडणुका होत्या. त्यामुळे हे संभाषण कोणालातरी पुरवण्यात आले होते? यामागे नेमका कोणाचा हेतू होता? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News Live Updates : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; बोरघाटात वाहनांची रांग

शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, साप्ताहीक सुट्टी निमित्ताने मुंबईकर आणि ठाणेकर मुंबईच्या बाहेर जाताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांची गर्दी दिसून येत आहे. परिणामी बोरघाटात वाहनांची रांग लागली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे २ किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *