Headlines

Lust Stories 2: काजोलसह इंटिमेट सीन कसा शूट केला? कुमूद मिश्रा यांनी केला खुलासा “मी जेव्हा तिचा…”

[ad_1]

Lust Stories 2: अभिनेते कुमूद मिश्रा (Kumud Mishra) यांना आपल्या वेगळ्या पठडीतील भूमिकांसाठी ओळखलं जातं. सध्या ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) मध्ये त्यांनी निभावलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा आहे. यामध्ये त्यांनी काजोलच्या (Kajol) पतीची भूमिका निभावली आहे. यावेळी त्यांनी काही बोल्ड सीन्स दिले आहेत. यादरम्यान, शुटिंगचा अनुभव कसा होता याचा खुलासा त्यांनी केला आहे. 

“लस्ट स्टोरीजची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला फार मजा आली. मी याआधी असं काम केलं नव्हतं. काही गोष्टींमुळे माझ्या मनात शंका होती. मी पहिल्यांदाच हे करत असल्याने, स्पष्टता असल्याशिवाय पुढे न जाण्याचं ठरवलं होतं. मी दिग्दर्शकाची भेट घेतल्यानंतर बराच वेळ चर्चा केली. महत्त्वाचं म्हणजे जे सीन्स कठीण वाटत होते, त्यावर आम्ही चर्चा करत नव्हतो. पण त्यांच्याशी चर्चा करताना मला अंदाज आला. या प्रोजेक्टसंबंधी आमचं वर्कशॉपही झालं. माझी लेखक आणि दिग्दर्शकाशी चर्चा झाल्यानंतर हे फार गंभीरपणे विषय हाताळत असल्याचं लक्षात आलं. तुम्ही चित्रपट पाहिला असता लक्षात आलं की, यामध्ये फार लेअर्स, भावना आहेत. तसंच नात्यातील गुंता दाखवण्यात आला आहे,” असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

बोल्ड सीन्स करताना मनात काही संकोच असतो का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “हो नक्कीच थोडी शंका असते. मी आता 21 वर्षांचा नाही. त्यामुळे एका वयानंतर असे सीन करताना मनात अनेक प्रश्न येतात. अनेकदा साध्या सीनमध्येही तुमची अशी स्थिती होते. असंही होतं की, तुम्ही साधे सीन करत आहात पण व्यवस्थित परफॉर्म करु शकत नसता  याचं कारण तुमच्यात एक भिंत असते, जो दोन अभिनेत्यांमध्ये निर्माण झालेली असते. ही भिंत तुटणं गरजेचं असतं. काजोल माझी सहकलाकार होती. तिचं काम जबरदस्त आहे. अभिनय ती इतका सहजपणे करते जणू काही त्यासाठीच जन्म झाला आहे. इतकी वर्षं काम केल्यानंतर त्यांना आपल्या सहकाऱ्याशी कसं वागायचं हे माहिती असतं. काजोलच सर्वात मोठी सकारात्मक बाब होती. तिच्यामुळे अनेक गोष्टी सहज झाल्या”.

मुलाने चित्रपट पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “माझ्या कुटुंबातील अद्याप कोणीही चित्रपट पाहिलेला नाही. मुलगा तर फार लहान आहे. त्यामुळे त्याने तो चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा नाही. कुटुंब काय प्रतिक्रिया देईल याची मी वाट पाहत आहे. अनेकदा जेव्हा ते त्या विषयावर बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना ते आवडलं आहे असा असतो. त्यांना ते आवडावं अशी माझी इच्छा आहे. पण जर त्यांना आवडलं नाही तर ते थेट सांगतात. जेव्हा कोणी माझ्या कामातील चुका दाखवतं तेव्हा मला ते आवडतं. आपल्याकडे काहीतरी नवीन करण्याची संधी आहे असं वाटतं. मग मी त्या दिशेने काम करतो”. 

दरम्यान, बोल्ड सीन शूट होताना सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर असतात. हा अनुभव कसा होता असंही कुमूद मिश्रा यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले “इंटिमसी को-ऑर्डिनेटरची मोठी भूमिका असते. ज्याप्रमाणे डायलॉग कोच, कॅमेरामनची भूमिका असते तसंच इंटिमसी को-ऑर्डिनेटरचीही असते. आपल्या देशात हे फार उशिरा आलं आहे. आपल्याकडे असे चित्रपट फार कमी प्रमाणात तयार होतात. यामुळेच असे बोल्ड विषयांना कोणी हाताळू शकत नव्हतं. सध्याच्या काळात इंटिमसी को-ऑर्डिनेटर असणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही जे काही सीन करतो त्याचं एक गणित असतं. त्या सीनमध्ये आपल्याला भावना टाकायच्या असतात. पण या ट्रेंडचं मी स्वागत करतो”. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *