Headlines

Lust Stories 2 चे बोल्ड सीन पाहताना रुममध्ये कोणी आलं तर…; Tamannaah Bhatia चा सल्ला

[ad_1]

Tamannaah Bhatia Lust Stories 2 : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिचा आगामी चित्रपट ‘लस्ट स्टोरी 2’ मुळे चर्चेत आहे. त्यात तमन्ना तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही तर त्या चित्रपटात त्या दोघांचेही बोल्ड सीन्स देखील आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केले. या चित्रपटात तमन्नानं तिची ‘नो किसिंग पॉलिसी’ देखील मोडली आहे. आता तमन्नानं प्रेक्षकांना जर चित्रपट पाहत असताना अचानक आपल्या रुममध्ये कोणी आलं की काय करावं याविषयी सांगितलं आहे. 

तमन्नाचा हा व्हिडीओ नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत तमन्ना सुरुवातीला सांगते की ‘लस्ट स्टोरीज 2’ पाहत असताना रुममध्ये अचानक कोणी आलं की काय करायला हवं आणि त्यावेळी ‘लस्ट स्टोरीज 2’ कसा पाहावा? याविषयी सांगायला सुरुवात करते. तमन्ना म्हणाली की “जर तुम्ही ‘लस्ट स्टोरीज 2’ पाहत आहात आणि अचानक तुमच्या रुममध्ये कोणी आलं की पॅनिक करू नका किंवा तिथेच पॉज करू नका. त्यात लस्ट शिवाय खूप काही आहे. त्यात ड्रामा आहे, रोमान्स आहे, अॅक्शन आहे, आईचे प्रेम, आजीचे प्रेम, एक्सचं प्रेम आणि मोलकरणीचं प्रेम सगळं आहे. फक्त नावावर नका जाऊ. सगळ्यांना दाखवा…”

पुढे तमन्ना म्हणाली, “सगळ्यांना हा चित्रपट दाखवा. काय होईल वादळ येईल? आभाळ फुटेल? वायफाय बंद होईल? असं काही होणार नाही ना… इतका विचार कराल तर तुमच्या कपाळावर अॅब्स येतील. शांत रहा चिंता करू नका… नेटफ्लिक्सवर ‘लस्ट स्टोरीज 2’ पाहा.”  

दरम्यान, तमन्नाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “खरंच हा चित्रपट कुटुंबासोबत पाहू शकत नाही त्यामुळे तो कुटुंबासोबत पाहू शकत नाही. त्यामुळेच तुम्ही त्याला अस प्रमोट करत आहात. पण लोक पाहतिल जर कॉन्टेन्ट चांगला असेल तर. अशा कॉन्टेन्टचं प्रमोशन करत तुम्ही स्वत: चा दर्जा कमी करू नका.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तमन्ना तू हा चित्रपट तुझ्या वडिलांसोबत बघ.”

हेही वाचा : “एका टॉयलेटमध्ये 400 कैदी…”, तुरुंगातून बाहेर येताच Ajaz Khan चा आर्यन खानसोबतच्या भेटीबद्दल खुलासा

या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यात तमन्ना आणि विजयशिवाय, काजोल, नीना गुप्ता, तिलोत्तमा शोम, मृणाल ठाकूर, अमृता सुभाष, कुमुद मिश्रा, अंगद बेदी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर आज हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *