Headlines

लोणावळय़ात पर्यटकांची गर्दी; कोंडीमुळे पर्यटकांसह रहिवाशांना मनस्ताप

[ad_1]

लोणावळा : आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा परिसरात गर्दी केली होती. शहरातील सर्व रस्त्यांवर कोंडी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वेहरेगाव ते कार्ला फाटा, खंडाळय़ातील राजमाची गार्डन परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होता. आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने मुंबई- पुण्यासह वेगवेगळय़ा भागांतील पर्यटकांनी वर्षांविहारासाठी गर्दी केली होती. पर्यटक शनिवारी (२३ जुलै) सहकुटुंब मोटारीतून लोणावळा, खंडाळा परिसरात आले होते. अनेकांनी हॉटेलमधील खोल्यांचे आगाऊ आरक्षण केले होते. लोणावळा, खंडाळा परिसरातील सर्व ठिकणी पर्यटकांची गर्दी झाली होती. श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वेहेरेगाव ते कार्ला फाटा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोणावळा शहरात पुणे-मुंबईतून मोठय़ा संख्येने मोटारीतून पर्यटक आले होते. खंडाळय़ात मोठय़ा प्रमाणावर कोंडी झाली होती. खंडाळय़ातील शासकीय रुग्णालय परिसरात वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले. लोणावळय़ातील रायवुड पार्क, सहारा पूल ते मावळ चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

लोणावळय़ातील कुमार चौक, गवळी वाडा नाका परिसरात कोंडी झाली होती. चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते. पुण्यातून अनेक पर्यटक लोकलने लोणावळा परिसरात आले होते. त्यामुळे लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात गर्दी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होते. लोणावळा शहर तसेच मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *