Headlines

Loan : एक लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर किती EMI बसतो? जाणून घ्या माहिती

[ad_1]

मुंबई : लोकांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैशांची गरज असते, त्यामुळे लोक बऱ्याचदा कर्जाच्या पर्यायांकडे वळतात. परंतु तुम्हाला तर हे माहित असेल की, कर्ज घेणं काही सोपं नाही, त्यासाठी आपल्या अनेक प्रक्रियेतुन जावे लागते. तसेच वेगवगळ्या प्रकारच्या कर्जासाठी वेगवेगळी प्रक्रिया असते. या सगळ्यात सोपं असतं ते म्हणजे वैयक्तिक कर्ज, म्हणजेच होम लोन.

जर तुमचे बँकेत खाते असेल, तर तुम्हाला वैयक्तिक कर्जासाठी अनेक ऑफर देखील मिळतील. त्यात ही फार सोपी प्रक्रिया आहे, ज्यासाठी बहुतेक लोकं या प्रक्रियेकडे वळतात.  परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की त्याचे व्याज दर कार कर्जापेक्षा खूप जास्त आहेत.

कारण वैयक्तिक कर्ज हेअसुरक्षित कर्जे असतात. याचा अर्थ कर्ज कोणत्याही मालमत्तेद्वारे समर्थित नाही; म्हणजेच कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे मालमत्ता किंवा सोन्यासारखी कोणतीही मालमत्ता असण्याची गरज नाही.

बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की, समजा मी एक लाख रुपये वैयक्तिक कर्ज घेतलं तर मला किती परत फेड करावी लागेल. तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. तसेच कोणती बँक तुम्हाला किती व्याजदरावर कर्ज देईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणे करुन तुम्हाला निर्णय घेणं देखील सोपं होईल.

पंजाब नॅशनल बँक

प्रक्रिया शुल्क – १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत कोणतेही शुल्क नाही
व्याजदर- 7.90 ते 14.45%
EMI-2023-2350 रुपये

इंडियन बँक

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 1%
व्याजदर- 9.05 ते 13.65%
EMI-2078-2309 रुपये

युनियन बँक ऑफ इंडिया

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 0.5 % पर्यंत (किमान रु. 500) प्लस GST
व्याजदर- 9.30 ते 13.40%
EMI-2090-2296 रुपये

बँक ऑफ महाराष्ट्र

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 1% अधिक GST (किमान रु. 1000)
व्याजदर- 9.45 ते 12.80%
EMI-2098-2265 रुपये

IDBI बँक

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 1% (किमान रु. 2500)
व्याजदर- 9.50 ते 14%
EMI- 2100-2327 रुपये

पंजाब आणि सिंध बँक

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 0.5 % ते 1 % आणि GST
व्याजदर- 9.50 ते 11.50%
EMI-2100-2199 रुपये

स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रक्रिया शुल्क – 31 मार्च 2022 पर्यंत कोणतेही शुल्क नाही
व्याजदर- 9.60 ते 13.85%
EMI-2105-2319 रुपये

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 1%
व्याजदर- 9.85 ते 10.05%
EMI- 2117-2149 रुपये

इंडियन ओव्हरसीज बँक

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 0.4 ते 0.75 टक्के
व्याजदर- 10 ते 12.05%
EMI-2125-2277 रुपये

नैनिताल बँक

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 1% अधिक GST
व्याजदर- 10 ते 10.50%
EMI – 2125-2149 रुपये

ऍक्सिस बँक

प्रक्रिया शुल्क – किमान प्रक्रिया शुल्क रु.3999
व्याजदर- 10.25 ते 21%
EMI- 2137-2705 रुपये

एचडीएफसी बँक

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 21 टक्के, किमान 2999 रुपये आणि कमाल 25000
व्याजदर- 10.25 ते 21%
EMI- 2137-2705 रुपये

कोटक महिंद्रा बँक

प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 2.50 टक्के पर्यंत जीएसटी
व्याजदर – 10.25 ते 24%
EMI- 2137-2877 रुपये

हा डेटा बँकेकडून आलेल्या करंट अपडेटवर आधारीत आहे.  काही कारणांमध्ये EMI बदलू देखील शकतो.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *