Headlines

लाडक्या लेकासाठी सोनम कपूरनं घेतलं महागडं गिफ्ट; photo व्हायरल

[ad_1]

Sonam Kapoor and Anand Ahuja: सोनम कपूरनं (Sonam Kapoor) नुकतंच लहान गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पालक होण्याचा आनंद सध्या सोनम आणि तिचा नवरा आनंद अहूजा अनुभवत आहेत. तुमच्या आयुष्यात लहान बाळ आलं की तुमचं आयुष्यच बदलून जातं सध्या या बदलाचा अनुभव सोनम कपूर आणि आनंद अहूजा घेत आहेत. (actress sonam kapoor buys expensive gift for his baby boy photo goes viral on social media)

गेल्या महिन्यात 20 ऑगस्ट रोजी सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे सध्या आपल्या या सुंदर मुलासाठी ते दोघंही खास वेळ काढतं आहेत. 

गरोदरपणात सोनमची मॅटर्निटी फॅशनही खूप लोकप्रिय झाली होती. प्रेग्रंनन्ट असताना सोनमनं आपले सगळे छोटे मोठे अपडटे्स सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. आता मुलाच्या आगमनानंतरही केवळ सोनमच नाही तर आनंदही त्याच्याशी संबंधित छोटे-मोठे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत आहे. अलीकडेच त्याने आपल्या गोंडस मुलासाठी क्यूट स्नीकर्सची खरेदी केले आहेत 

आनंदने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात स्नीकर्सचे तीन सेट दिसत आहेत. ज्यातले दोन सेट्स हे खास छोट्या मुलासाठी आहेत तर तिसरा त्यांच्यासाठी आहे. 

आनंदच्या या पोस्टवर कमेंट्सवर कमेंट्स येत आहेत. यामध्ये कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. सोनमच्या आईने कमेंट करताना लिहिले, “खूप क्यूट.” तर भाऊ हर्षवर्धन कपूरनेही यावर कमेंट केली आहे. चाहत्यांनीही आनंदच्या पोस्टवर खूप प्रेम केले. एका चाहत्याने कमेंट केली, “निवड आवडली.” तर दुसर्‍याने लिहिले, “अभिनंदन पापा, खूप सुंदर.”

सोनमच्या नवऱ्याला स्वतःला स्निकर्स खूप आवडतात. त्याचा भाने (Bhanne) नावाचा फॅशन ब्रॅण्डही आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *