Headlines

Kuldeep Yadav | कुलदीप यादवचा कहर, कोलकाताला बॅक टु बक 2 धक्के

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सच्या (Delhi Capitals) कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या फिरकीच्या जोरावर धमाका केलाय. कुलदीपने कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात आपल्या कोट्यातील 3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या.  (ipl 2022 dc vs kkr delhi capitals kuldeep yadav take back 2 back wickets he out to b Indrajith and sunil narine)

विशेष म्हणजे कुलदीपने प्रत्येक ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 2 फलंदाजांना लागोपाठ आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर त्यानंतर सामन्यातील 14 व्या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या. 

कुलदीपने सामन्यातील आठव्या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेतल्या. कुलदीपने या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर बाबा इंद्रजित (Baba Indrajith) आणि सुनील नरेन (Sunil Narine) या दोघांना आऊट केलं.

यामुळे कुलदीपला हॅटट्रिकची संधी होती. मात्र नितीश राणाने (Nitish Rana) या हॅटट्रिक बॉलचा बचावात्मक पद्धतीने सामना केला. त्यामुळे कुलदीपची हॅटट्रिकची संधी हुकली.

यानंतर कुलदीपने सामन्यातील 14 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरला आऊट केलं. त्यानंतर आक्रमक असलेला आंद्रे रसेलला झिरोवर विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती स्टंपिग आऊट केलं.

दरम्यान कुलदीपने आयपीएलच्या 15 व्या मोसमात एकूण 7 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिशेल मार्श, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, रोवमॅन पॉवेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन सकारिया.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन : एरॉन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, वेंकटेश अय्यर, बाबा इंद्रजीत (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, उमेश यादव, टीम साउथी आणि हर्षित राणा.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *